नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेते कन्हैया कुमार आणि गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी २८ सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.
अलीकडेच कन्हैया कुमार यांनी राहुल गांधी यांची यासंदर्भात भेट घेतली होती, त्यानंतर त्यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाची शक्यता वाढली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैया कुमारसाठी पक्षाची योजना आहे, ती अंमलात आणली जाईल. त्याचवेळी, अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की कन्हैया केवळ बिहारपुरता मर्यादित राहणार नाही, पक्ष त्यांना राष्ट्रीय स्तरावरही उतरवू शकतो. असे सांगितले जात आहे की राहुल गांधी, कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यापूर्वी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांचीही भेट घेतली होती.
वास्तविक, प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींना मत दिले होते की जुन्या नेत्यांचा प्रभाव आता काँग्रेस पक्षात संपला आहे, त्यामुळे आता तरुणांना संधी दिली पाहिजे. कन्हैया आणि जिग्नेशच्या प्रवेशाने याची भरपाई होऊ शकते, असे ते म्हणाले. कन्हैया कुमार गेल्या दीड वर्षांपासून राजकारणात क्वचितच सक्रिय आहे. प्रशांत किशोर म्हणतात की कन्हैयाची भाषण देण्याची शैली मतदारांना भुरळ घालू शकते.
हे ही वाचलं का?
मात्र, बिहार काँग्रेसमधील कोणत्याच नेत्याकडून याबाबत स्पष्टता आलेले नाही. कन्हैयाच्या संभाव्य प्रवेशामुळे त्यांचे पद कमी होईल, अशी भीती अनेक वरिष्ठ नेत्यांना वाटत असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी कन्हैया कुमार यांनी जनता दल युनायटेडचे (जेडीयू) नेते अशोक चौधरी यांचीही भेट घेतली होती. त्यांच्या या बैठकीची चर्चा झाली होती, पण त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.
हे ही वाचलं का?