ED Raid on Hasan Mushrif House : अधिकार्‍यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली : नवीद मुश्रीफ | पुढारी

ED Raid on Hasan Mushrif House : अधिकार्‍यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली : नवीद मुश्रीफ

कागल, पुढारी वृत्तसेवा : ED Raid on Hasan Mushrif House : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर इडीने टाकलेला छापा तब्बल बारा तासांनंतर संपला. यावेळी उपस्थित मुश्रीफ समर्थकांनी जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी नवीद मुश्रीफ यांना खांद्यावर उचलून घेतले. आम्ही तपास अधिकार्‍यांना सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली आहेत, असे यावेळी आ. मुश्रीफ यांचे चिरंजीव आणि गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी सांगितले. दरम्यान, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी सायंकाळी सातनंतर देखील इडीचे अधिकारी तपास करीत होते.

नवीद मुश्रीफ म्हणाले, राजकीय आकसापोटी छापा टाकण्यात आला आहे. अधिकार्‍याांकडून वेगवेगळे प्रश्न विचारले गेले. त्यांना समाधानकारक उत्तर देण्यात आली. आ. मुश्रीफ यांच्याशी अद्याप बोलणे झालेले नाही. सर्वसामान्य जनता जोपर्यंत आ. मुश्रीफ आणि कुटुंबाच्या पाठीशी आहे तोपर्यंत कोणतीही शक्ती आमचे काहीही करू शकत नाही.

ED Raid on Hasan Mushrif House : तपास यंत्रणेतील अधिकारी बाहेर येऊन कोणाशी तरी फोनवरून बोलत होते. त्यांना फोन येत होते, असे सांगून नवीद मुश्रीफ म्हणाले, दिवसभर गट, पक्ष न पाहता मुश्रीफ कुटुंबीयांना लोकांनी पाठिंबा दिला. सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे. तपास यंत्रणेला केवळ गोरगरिबांच्या ऑपरेशनची कागदपत्रे मिळाली, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, निवासस्थानातील तपास संपल्यानंतर तपास यंत्रणेतील अधिकारी सायंकाळी सातच्या दरम्यान निघून गेले; मात्र त्यानंतरही माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी तपास सुरूच होता. रात्री नऊपर्यंत हा तपास सुरू होता.

Back to top button