Air India : लघुशंका प्रकरणानंतर आता महिलेच्या जेवणात निघाला खडा, ट्विटरवरून तक्रार | पुढारी

Air India : लघुशंका प्रकरणानंतर आता महिलेच्या जेवणात निघाला खडा, ट्विटरवरून तक्रार

पुढारी ऑनलाइन न्यूज : Air India : एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये दिलेल्या जेवणात महिलेला दगड सापडला. या महिलेने ट्विटरवरून याचे छायाचित्र पोस्ट केले आहे. त्यामुळे नुकत्याच घडलेल्या महिलेच्या अंगावर लघुशंकेच्या प्रकरणानंतर एअर इंडिया पुन्हा एकदा गुणवत्ता नसलेले जेवण दिल्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आली आहे.

Air India : एका महिला ट्विवटर युजरने जेवणाची दोन छायाचित्रे शेअर केली. याच्या एका छायाचित्रात तिच्या हातात एक छोटा दगड आहे. तर दुस-या छायाचित्रात ज्या फुड पॅकेटमधून तो निघाला ते पॅकेट्स दिसत आहे. ट्विटरवरून तक्रार करणा-या या महिलेचे नाव सर्वप्रिया सांगवान असे आहे. एअर इंडियाच्या फ्लाइट 215 मधील जेवणात हा दगड सापडल्याची तक्रार तीने केली आहे.

सर्वप्रियाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” Air India : तुम्हाला दगडमुक्त अन्न एअर इंडिया (@airindiain) सुनिश्चित करण्यासाठी संसाधने आणि पैशांची गरज नाही. आज AI 215 च्या फ्लाइटमध्ये मला माझ्या जेवणात हेच मिळाले. क्रू मेंबर, सुश्री जेडॉन यांना माहिती देण्यात आली. असा निष्काळजीपणा अस्वीकार्य आहे.”

सर्वप्रियाच्या या ट्विटवर अनेक ट्विटर युजर्सने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये अनेकांनी टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियावर गंभीर निष्काळजीपणा केल्याबद्दल मोठ्या प्रमाणात टीका केल्या आहेत. तसेच एअर इंडियाच्या सेवांबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Air India : एका ट्विटर युजरने प्रतिक्रियेत लिहिले आहे,”प्रिय @TataCompanies : JRD टाटा यांनी एकदा विमान उद्योगासाठी मानके सेट केली. सरकारने ते ताब्यात घेण्यापूर्वी त्यांनी #AirIndia हा जागतिक स्तरावर प्रतिष्ठित ब्रँड बनवला. आता तुम्ही मालक म्हणून परत आला आहात, नवीन पातळी गाठत आहात? कॉर्पोरेट निरीक्षण नाही का? तुम्ही #PeeGate आणि आता हे कसे व्यवस्थापित करता.”
”एअरइंडियाला एअरलाइन्स उद्योगात सर्वोत्तम स्पर्धा करायची होती, पण ती भारतीय रेल्वेशी स्पर्धा करत आहे, असे दिसते.”

आणखी एकाने मजेशीर लिहिले आहे, ”Air India : देवा आशीर्वाद दे रे. तुटलेले दातही तुटले असते. @airindiainis अलीकडे सर्वात वाईट कारागीर आहे.”

दरम्यान, सर्वप्रियाच्या ट्विटला टाटांच्या एअर इंडिया (Air India) व्यवस्थापनाने ट्विट करून उत्तर दिले आहे. एअर इंडियाने रिप्लायमध्ये म्हटले आहे की, ”प्रिय मॅडम, हे दखल घेण्यास पात्र आहे आणि आम्ही आमच्या केटरिंग टीमसोबत हा मुद्दा त्वरित उचलत आहोत. कृपया आम्हाला परत येण्यासाठी थोडा वेळ द्या. तुम्ही हे आमच्या लक्षात आणून दिल्याबद्दल आम्ही तुमचे कौतुक करतो.”

एअर इंडियाला टाटाने नुकतेच सरकारकडून पुन्हा खरेदी केले आहे. एअर इंडिया हे डबघाईला आले होते. टाटाने खरेदी केल्यानंतर एअर इंडियाच्या सुविधांबाबत अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, नुकत्याच घडलेल्या या दोन प्रकरणांमुळे टाटाच्या सेवेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

हे ही वाचा :

पृथ्वी शॉ चे द्विशतक : आसामविरुद्ध मुंबईची मजबूत धावसंख्या; 2 बाद 397 धावा

Air India urinating case | विमानात महिलेवर लघुशंका केल्याप्रकरणी शंकर मिश्रा याला अटक, बंगळूरमध्ये कारवाई

Back to top button