Air India urinating case | विमानात महिलेवर लघुशंका केल्याप्रकरणी शंकर मिश्रा याला अटक, बंगळूरमध्ये कारवाई

Air India
Air India
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका केल्याप्रकरणी (Air India urinating case)  संशयित शंकर मिश्रा याला बंगळूर येथून अटक करण्यात आली आहे. एस मिश्रा याला काल रात्री अटक करण्यात आली असून त्याला दिल्लीत आणण्यात आले आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

२६ नोव्हेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या (Air India) बिझनेस क्लासमध्ये हा धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकार घडला होता. एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये मद्यधुंद अवस्थेतील शंकर मिश्रा याने महिला सहप्रवाशावर लघुशंका केली. याप्रकरणी ७० वर्षीय महिला प्रवाशाने तक्रार केल्यानंतर केबिन क्रू मेंबर्सनी त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर सदर महिलेने थेट टाटा समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहिल्यानंतर या प्रकाराची चौकशी सुरु करण्यात आली. आता या प्रकरणी संशयित शंकर मिश्रा याला अटक करण्यात आली आहे.

२६ नोव्हेंबर २०२२ रोजी एअर इंडियाचे विमान जेएफके (अमेरिका) वरून दिल्लीला जात असताना हा प्रकार घडला होता. या घटनेबाबत एअर इंडियाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. पुरुष प्रवाशाच्या कृत्यानंतर महिलेने केबिन क्रू मेंबर्सकडे तक्रार केली. पण त्यांनी त्या प्रवाशावर कसलीही कारवाई केली नाही. यामुळे विमान दिल्लीत उतरल्यानंतर तो पुरुष प्रवाशी बिनधास्तपणे निघून गेला. त्यानंतर महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पत्र पाठवल्यानंतरच एअर इंडियाने या प्रकाराची चौकशी केली.

२६ नोव्हेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी १ च्या सुमारास न्यूयॉर्क-जेएफके विमानतळावरून निघालेल्या एअर इंडिया (Air India ) फ्लाइट AI-102 मध्ये ही घटना घडली. "दुपारचे जेवण झाल्यावर आणि लाइट बंद झाल्यानंतर दुसरा एक प्रवासी मद्यधुंद अवस्थेत माझ्या सीटकडे आला. त्याने त्याच्या पँटची चेन काढली आणि माझ्यासमोरच लघुशंका केली. हा प्रकार किळसवाणा आणि लज्जा उत्पन्न होईल असा होता", असे महिलेने पत्रात म्हटले होते. त्याने लघुशंका केल्याने कपडे, बॅग आणि शूज भिजल्याचेही त्यांनी नमूद केले होते.

लघुशंका केल्यानंतर तो माणूस तिथेच उभा राहिला. हा खूप लज्जास्पद प्रकार होता. त्यानंतर एका सहप्रवाशाने त्याला निघून जाण्यास सांगितले आणि त्यानंतरच तो तेथून निघून गेला. तो निघून गेल्यावर ताबडतोब केबिन क्रू मेंबर्सला घडलेला प्रकार निर्दशनास आणून दिला. "कपडे, शूज आणि पिशवी लघवीने पूर्णपणे भिजली होती. लघवीचा वास येत होता. त्यानंतर पिशवी आणि शूजवर जंतुनाशक फवारले …," असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

त्यानंतर त्या एअरलाइनच्या स्वच्छतागृहात निघून गेल्या. विमानातील कर्मचाऱ्याने त्यांना पायजामा आणि चप्पल बदलण्यासाठी दिले. त्या सुमारे २० मिनिटे स्वच्छतागृहाजवळ उभ्या राहिल्या. कारण त्यांना त्यांच्या भिजलेल्या सीटवर परत जायचे नव्हते. त्यानंतर त्यांना एक अरुंद क्रू सीट देण्यात आली, जिथे त्या एक तास बसल्या आणि नंतर त्यांना त्यांच्या सीटवर परत येण्यास सांगण्यात आले. "विमानातील कर्मचाऱ्यांनी भिजलेल्या सीटवर कागद टाकले. तरीही सीटवर लघवीचा वास येत होता आणि ती ओलसर होती," अशा शब्दांत त्यांनी घडलेला प्रकार पत्रातून सांगितला होता.

लघुशंका करणे भोवले….

एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्राची तो काम करत असलेल्या कंपनीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. तो वेल्स फार्गोच्या इंडिया चॅप्टरचे उपाध्यक्ष पदावर होता. याविषयी कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने या संदर्भात निवेदन जारी केले आहे. कंपनीने म्हटले आहे कंपनीत कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक वर्तानाच्या सर्वोच्च मानकांवर अवलंबून असते. मिश्रा याच्या कृत्यामुळे कंपनीवर झालेले आरोप आम्हाला खूप वेदनादायी वाटतात. त्यामुळे आम्ही त्याला काढून टाकले आहे. तसेच आम्ही कायद्याच्या अंमलबजावणीला सहकार्य करत आहोत. (Air India urinating case)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news