Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकरचे वडील किरीट सोमय्यांसोबत उपमुख्यमंत्री फडणवीसांना भेटले

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकरचे वडील किरीट सोमय्यांसोबत उपमुख्यमंत्री फडणवीसांना भेटले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी (Shraddha Walker Murder Case) पोलीस सध्या तपास करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज श्रद्धा वालकर हिच्या वडिलांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा (Shraddha Walker Murder Case)  तपास सध्या दिल्ली पोलिसांकडे आहे. याप्रकरणात खूनी आफताबला घेऊन दिल्ली पोलिस विविध ठिकाणी तपास करत आहे. या प्रकरणात दररोज नवीन खुलासा केला जात आहे. दरम्यान याप्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

या जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमोनियम प्रसाद यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या याचिकेवर आपले म्हणणे ठेवताना हायकोर्टाने म्हटले आहे की,  पोलिस त्याचा तपास करत आहेत, त्यामुळे न्यायालय त्यावर कोणत्याही प्रकारे लक्ष ठेवणार नाही. आम्हाला या याचिकेवर विचार करण्याचे कोणतेही योग्य कारण सापडत नसल्याचेही म्हणत सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी याचिकाकर्त्यावर दंडही ठोठावला आहे.

श्रद्धा वालकर मर्डर केसप्रकरणी एका खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलाने ही याचिका दाखल केली होती. या वकिलाने दाखल केलेल्या जनहित याचिकेत असा दावा केला होता की, दिल्ली पोलिसांनी तपासाचा सूक्ष्म आणि संवेदनशील तपशील प्रसारमाध्यमांद्वारे जनतेसमोर उघड केला आहे. त्यामुळे हे प्रकरण दिल्ली पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्यात यावे. पण ही याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news