भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जे. पी. नड्डा यांना मिळणार मुदतवाढ | पुढारी

भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जे. पी. नड्डा यांना मिळणार मुदतवाढ

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा- भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे आयोजन येत्या १६ आणि १७ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या वेळी जे. पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढील वर्षीच्या मध्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुका नड्डा यांच्या नेतृत्वाखाली लढविण्याचे संकेत याआधीच पक्षाने दिलेले आहेत.

जे. पी. नड्डा यांचा भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ जानेवारी महिन्याच्या अखेरीस समाप्त होत आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष निवडण्याच्या अनुषंगाने पक्षाने कार्यकारिणी बैठकीचे आयोजन १६ व १७ तारखेला केले आहे. या बैठकीत नड्डा यांनाच मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. यावर्षी ९ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या रणनीतीवरही या बैठकीदरम्यान खलबते होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button