[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता. कार्यालयात अतिरिक्त वेळ खर्च केलात तर तुमच्या घरगुती जीवनावर परिणाम होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः तुम्हाला वेगवान पावले उचलून सर्वांचा आधारस्तंभ होण्याची गरज.सहकार्यांना प्रोत्साहित करून कठोर परिश्रम करायला भाग पाडावे लागेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. प्रेयसीला वेळ देण्याचा प्रयत्न कराल; परंतु कामामुळे तुम्ही तिला वेळ देण्यात यशस्वी होणार नाही. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः कुटुंबातील सदस्यांना जीवनात विशेष स्थान असेल. दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशांनी भरलेला आहे. सहजपणे समस्यांवर मात कराल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः विनाकारण मानसिक त्रास करून घ्याल. सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात हे तुमच्या चिंतेचे कारण ठरेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः कामाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत प्रामाणिक राहा. दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. मनोबल उंचावेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः दिवसभर चिंतेत राहू शकता. उद्योग, व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. क्षुल्लक वाद विसरून जा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः तुमच्याजवळील अनुकंपेचा गुण आणि समजूतदारपणा याची गोमटी फळे मिळतील. परंतु, घाईघाईत घेतलेल्या निर्णयांमुळे दबाव येणार नाही याची काळजी घ्या. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल. देणी परत मिळवाल. नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. कौटुंबिक बंधन, कर्तव्य विसरू नका. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः प्रेमात तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः सायंकाळच्या वेळी तुम्हाला वाटेल की, तुम्ही आपला किती वेळ वाया घालवला. कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडे लक्ष देणे महत्त्वाचे. शिस्तबद्ध, पण मुले नसलेले घर निर्जीव ठरते. दिवसाच्या उत्तरार्धात आराम करा.[/box]
– ज्यो. मंगेश महाडिक