

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिवाळ्याच्या दिवसात कोवळ्या उन्हात, पर्यटक जंगल सफारीसाठी बाहेर पडतात. निसर्गाच्या सानिध्यात दुर्मिळ वन्य प्राण्यांचे दर्शन हा एक सुखद अनुभव असतो; पण हेच वन्यप्राणी जर पर्यटकांवर दहशत माजवू लागले तर हा एक थरारक अनुभव ठरतो. असा गेंड्याने पर्यटकांचा पाठलाग केल्याचा थरारक व्हिडिओ सध्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सफारीमध्ये प्राणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या तीन वाहनांवर एका गेंड्याने हल्ला केला. गाडीच्या मागे पळत सुटलेल्या गेंड्याने पर्यटकांची पळता भुई थोडी केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते. या गाडीमधील पर्यटकांनी जीवाच्या आकांताने केलेला आरडाओरडा पाहायला मिळत आहे. (Rhinoceros Video)
व्हायरल व्हिडीओ आसाममधील मानस राष्ट्रीय उद्यानामधील आहे. पर्यटक गाडीतून जंगल सफारीचा आनंद लुटत असताना अचानक गेंडाने त्यांचा पाठलाग सुरु केला. गेंडाने तीन वाहनांच्या ताफ्याचा सुमारे तीन किलोमीटर पाठलाग केला.या व्हिडिओमध्ये पर्यटकांनी भरलेली जीप वेगाने धावताना दिसून येत आहे. जसजसा गेंडा जवळ येऊ लागला तसतसा पर्यटकांच्या जीप वेगाने धावताना दिसत आहे.
वाहन चालकाला गाडी वेगात चालव म्हणत जीवाच्या आकांताने पर्यटक ओरडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. एक महिला पर्यटक खूप घाबरलेल्या अवस्थेत ओरडत असल्याचेही दिसते. घाबरलेल्या महिलेची परिस्थिती पाहता ही स्थिती किती गंभीर असेल याची कल्पना येते. सलग तीन किलोमीटर जीपचा पाठलाग केल्यानंतर गेंडा मध्येच एका झुडपात घुसतो. यानंतर पर्यटक सुटकेचा नि:श्वास सोडतात.
हेही वाचा