“ऋषभ पंतच्‍या कारला अपघात झोप आल्‍यामुळे नव्‍हे, तर…”

“ऋषभ पंतच्‍या कारला अपघात झोप आल्‍यामुळे नव्‍हे, तर…”
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय संघाचा यष्‍टीरक्षक ऋषभ पंतच्‍या कारला शुक्रवारी ( दि. ३० ) पहाटे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्‍याच्‍यावर डेहराडून येथील हॉस्‍पिटलमध्‍ये उपचार सुरु आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्‍यांच्‍यावर उपचार करत आहे. दरम्‍यान, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ( DDCA) संचालक श्‍याम शर्मा यांनी स्‍पष्‍ट केले की, ऋषभ पंतवरील उपचाराबाबत देशातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्‍ला घेतला जात आहे. सध्‍या तरी त्‍याच्‍यावर डेहराडून येथेच उपचार होणार आहेत. या वेळी त्‍यांनी ऋषभ पंत याच्‍या कार अपघातामागील कारणही सांगितले. ( Rishabh Pant Accident )

या वेळी श्‍याम शर्मा म्‍हणाले की, "कारला अपघात हा ऋषभ पंतला झोप लागल्‍यामुळे झाला नाही. तर रस्‍त्‍यावर असणारा खड्‍डा चुकवत असताना ऋषभ पंतचे कारवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला." दरम्‍यान, ऋषभ पंतची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्‍या ( बीसीसीआय ) तीन सदस्‍यांनी भेट घेतली. यामधील एक कायदेशीर सल्‍लागारही होते.

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सध्‍या ऋषभची प्रकृती सध्‍या स्‍थिर आहे. त्‍याच्‍या डोके आणि पाठीचे स्‍कॅन करण्‍यात आले आहे. या तपासणीचे सर्व रिपोर्ट हे सामान्‍य आहेत. पंतच्‍या पायाला फॅक्‍चर आहे. याचेही सर्व रिपोर्ट सामान्‍य आहेत. त्‍याच्‍या डोक्‍याला आणि कमरेला पार लागला आहे. ( Rishabh Pant Accident )

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news