Anand Mahindra Tweet : ‘मला वाटलं गजराज आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत …!” (पाहा व्हिडिओ) | पुढारी

Anand Mahindra Tweet : 'मला वाटलं गजराज आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत ...!" (पाहा व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिंद्रा ग्रुपच्या चेअरमन, उद्योगपती आनंद महिंद्रा ( Anand Mahindra Tweet)  यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्‍ये एक युवती  मंदिराच्या आवारात नृत्य करताना दिसत असून, गजराजाने आपल्या सोंडेने तिला आशीर्वाद  दिल्‍याचे दिसत आहे. हा शेअर केलेला व्हिडिओ सुमारे ८०० हून अधिक लोकांनी रिट्विट केला आहे, १० हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केला आहे.

Anand Mahindra Tweet : नवीन वर्षाच्या शुभेच्छा…

उद्योगपती आनंद महिंद्रा हे नेहमी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतात. आजही त्यांनी एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका नर्तिकेचा आहे. ती एका मंदिराच्या आवारात नृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडिओ कर्नाटकमधील कटील येथील श्री दुर्गापरमेश्वरी मंदिरातील आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पारंपारिक पोशाख परिधान केलेली  मंदिराच्या आवारात एका हत्तीसमोर नृत्य करताना दिसत आहे. तरुणी हत्तीकडे वळते आणि आशीर्वाद घेण्यासाठी तिला हात जोडते, हत्ती सोंड तिच्या डोक्यावर ठेवतो. नंतरही हत्ती आपल्या कृतीची पुनरावृत्ती करतो आणि त्याचे डोके हलवताना दिसतो. महिंद्रा यांनी हा व्हिडिओ ट्विट करत असताना लिहलं आहे की,”छान! मला वाटते की हा गजराज आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे”

हेही वाचा : 

Back to top button