Cough Syrup deaths in Uzbekistan | उझबेकिस्तानात १८ मुलांचा मृत्यू; भारतातील मॅरियन बायोटेकच्या कफ सिरपचे उत्पादन थांबवले : मनसुख मांडविया | पुढारी

Cough Syrup deaths in Uzbekistan | उझबेकिस्तानात १८ मुलांचा मृत्यू; भारतातील मॅरियन बायोटेकच्या कफ सिरपचे उत्पादन थांबवले : मनसुख मांडविया

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय कंपनीने उत्पादित केलेल्या कफ सिरप औषधाच्या सेवनाने उझबेकिस्तानातील १८ मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर भारतातील नोएडा येथील फार्मा कंपनी मॅरियन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडने (Cough Syrup deaths in Uzbekistan)  या कफ सिरपचे उत्पादन थांबवले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. या कंपनीच्या कफ सिरप घातक घटक आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे मांडविया यांनी स्पष्ट केले आहे.

(Cough Syrup deaths in Uzbekistan) दरम्यान, उत्तर प्रदेश औषध नियंत्रण विभाग आणि सीडीएससीओच्या पथकांने नोएडा येथील कंपनीची संयुक्तपणे तपासणी केली. तर सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) उझबेकिस्तानच्या राष्ट्रीय औषध नियामकाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. कफ सिरपचे नमुने चाचणीसाठी चंदीगड येथील प्रादेशिक औषध प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तपासणी अहवालाच्या आधारे योग्य ती पुढील कारवाई केली जाणार आहे.

मॅरियन बायोटेकचे कायदेशीर प्रमुख हसन यांनी कंपनीच्या वतीने मुलांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सरकारकडून चौकशी केली जात आहे. कफ सिरपचे नमुने घेण्यात आले आहेत. अहवालाच्या आधारे कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, मॅरियन बायोटेकने उत्पादित केलेल्या कप सिरप डॉक 1 मॅक्सचा जास्त डोस घेतल्याने तीव्र श्वसनाच्या त्रासामुळे १८ मुलांचा मृत्यू झाला आहे. खोकल्याच्या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलचा वापर केला जातो. याच्या प्रमाणामध्ये थोडाफार फरक पडला, तर ते हानिकारक ठरू शकते, असे जाणकारांनी सांगितले.

दरम्यान, उझबेकिस्तान येथील वृत्तवाहिन्या आणि वेबसाईटवर याविषयीच्या बातम्या मोठ्या प्रमाणात झळकत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, या कंपनीचे सर्दी-तापावरील ‘डॉक-1 मॅक्स’ हे औषध या लहान मुलांच्या मृत्यूला जबाबदार असण्याचा संशय आहे. ‘डॉक-1 मॅक्स’ या औषधाच्या लिक्विड व गोळ्या स्वरूपामध्ये इथेलिन ग्लायकॉल या मूलद्रव्याचा समावेश आहे. संबंधित मूलद्रव्य हे विषारी मानले जाते. हे रसायन औद्योगिक दर्जाच्या ग्लिसरिनमध्ये सापडते आणि त्याचा औषधामध्ये वापर करण्यास मनाई आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button