अंतर्वस्त्रात दडवून आणलेले एक कोटी रुपयांचे सोने जप्त

अंतर्वस्त्रात दडवून आणलेले एक कोटी रुपयांचे सोने जप्त

कालिकत : दुबईहून अंतर्वस्त्रात लपवून आणलेले आणि कस्टम अधिकार्‍यांना चुकवण्यात यश आलेले एक कोटी रुपयांचे सोने पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. कालिकत विमानतळाबाहेर एका 19 वर्षीय युवतीला या प्रकरणाी अटक करण्यात आली आहे.

भारत आणि दुबई यांच्यात सोन्याच्या दरात चांगलीच तफावत असल्याने सोन्याची तस्करी सतत होत असते. असाच प्रकार कालिकत येथे उघडकीस आला. 19 वर्षीय शहला ही तरुणी दुबईहून कालिकत येथे आली. तेथे कस्टमच्या तपासणीत ती अधिकार्‍यांना चकवा देण्यात यशस्वी झाली. पण विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांनी तिला ताब्यात घेतले व साहित्याची कसून झडती घेतली असता तिच्या बॅगेतील अंतर्वस्त्रात एक किलो 88 ग्रॅम वजनाचे म्हणजेच एक कोटी रुपयांचे सोने आढळून आले.

पोलिसांनी तिला अटक केली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. दुबईहून मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news