Corona Update : देशभरात कोरोना बाधितांच्या संख्येत सौम्य घट | पुढारी

Corona Update : देशभरात कोरोना बाधितांच्या संख्येत सौम्य घट

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या  (Corona Update)संख्येत सौम्य घट नोंदवण्यात आली आहे. रविवारी दिवसभरात १९६ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, केरळमध्ये दोन कोरोनारुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला. दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत ४० ने घट नोंदवण्यात आली आहे. सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.८० टक्के तर कोरोना मृत्यूदर १.१९ टक्क्यांवर स्थिर नोंदवण्यात आला. तर, देशाचा दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.१५% आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ०.१४ टक्के नोंदवण्यात आला.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची (Corona Update) संख्या ४ कोटी ४६ लाख ७७ हजार ३०२ पर्यंत पोहचली आहे. यातील ४ कोटी ४१ लाख ४३ हजार १८१ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, ३ हजार ४३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत ५ लाख ३० हजार ६९५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत २२०.०४ कोटी डोस लावण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, चीनसह काही अन्य आशिया खंडातील देशांमध्‍ये कोरोना परिस्थिती बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने दिल्लीतील कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. (COVID-19 Testing) दरम्यान, कोरोना संकट वाढायच्या आधीच रुग्णालयांमधील तयारी मजबूत केली जात असून, सोमवारी (दि.२६) अधिकाऱ्यांचे एक पथक दिल्लीतील सर्व सरकारी रुग्णालयांना भेट देणार आहे.

तयारीचा भाग म्हणून मंगळवारी सर्व रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल घेतले जाणार असल्याची माहिती दिल्लीचे आरोग्य सचिव अमित सिंघला यांनी दिली. सिंघला यांनी यादृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक देखील रविवारी सकाळी घेतली. रुग्णालयात खाटांची संख्या पुरेशी ठेवण्यासहित इतर आवश्यक ती तयारी केली जावी, असे निर्देश सिंघला यांनी या बैठकीत दिले. (COVID-19 Testing)

हेही वाचलंत का ? 

Back to top button