corona update : दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत ‘अल्पवाढ’ | पुढारी

corona update : दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत 'अल्पवाढ'

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत अल्पवाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभरात २०१ कोरोना बाधितांची भर पडली. तर, केरळमध्ये एका रुग्णाचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान सक्रिय कोरोना बाधितांच्या संख्येत १७ ने वाढ नोंदवण्यात आली आहे. शनिवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.८०% आणि कोरोना मृत्यूदर १.१९ टक्क्यांवर स्थिर (corona update) नोंदवण्यात आला. तर दैनंदिन कोरोना संसर्गदर ०.१५% आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर ०.१४ % नोंदवण्यात आला.

corona update : देशाचा कोरोना मुक्तीदर ९८.८०% 

देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४ कोटी ४६ लाख ७६ हजारांहून अधिक झाली आहे. यातील ४ कोटी ४१ लाख ४२ हजार ७५१ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर ३ हजार ३९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत ५ लाख ३० हजार ६९१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशात कोरोना विरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत २२०.०४ कोटी डोस लावण्यात आले आहेत.
गुरुवारी दिवसभरात १ लाख ५ हजार ४४ डोस लावण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर, ९० कोटी ९७ लाखांहून अधिक कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील १ लाख ३६ हजार ३१३ तपासण्या शुक्रवारी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्येने २५ जानेवारी २०२२ रोजी ४ कोटींचा टप्पा ओलांडला होता.
हेही वाचा

Back to top button