Indian Army: सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना, १६ भारतीय जवान शहीद, ४ जण जखमी | पुढारी

Indian Army: सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना, १६ भारतीय जवान शहीद, ४ जण जखमी

पुढारी ऑनलाईन : उत्तर सिक्कीमजवळ शुक्रवारी (दि.२३) झालेल्या एका रस्ते अपघातात १६ भारतीय जवानांचा मृत्यू झाला, तर ४ जण हे गंभीर जखमी झाले आहेत. उतारावरून भारतीय जवानांचे वाहन खाली घसरल्याने हा भीषण अपघात झाला. दरम्यान अपघातस्थळी बचाव मोहिम सुरू करण्यात आली आहे. या अपघातातील मृतांमध्ये तीन भारतीय कनिष्ठ अधिकारी आणि १३ भारतीय जवानांचा समावेश आहे, असे भारतीय लष्कराने एका निवेदनात सांगितले आहे.

उत्तर सिक्कीममधील झेमा येथे लष्कराच्या ट्रकचा अपघात झाला. लष्कराच्या ताफ्यातील तीन वाहने ही शुक्रवारी (दि.२३) सकाळी चट्टेनमधून थंगूच्या दिशेने निघाले होती. दरम्यान झेमा याठिकाणी यामधील एक वाहन तीव्र वळणारून जात असताना हा अपघात घडला. हे लष्करी वाहन तिव्र वळणावरून खाली घसरल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातात १४ भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या अपघातातील चार भारतीय जवान हे गंभीर जखमी असून, त्यांना उपचारासाठी लष्कराच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संरक्षण मंत्र्यांकडून शोक व्यक्त

या भीषण दुर्घटनेत मृत्यू झालेल्या भारतीय जवानांच्या जिवीतहानीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. राजनाथ सिंह यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, उत्तर सिक्कीमधील रस्ता अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांना झालेल्या प्राणहानीमुळे खूप दुःख झाले आहे. त्यांनी दिलेली सेवा आणि वचनबद्धतेबद्दल देश त्यांच्याप्रति मनापासून कृतज्ञ आहे. या जवानांच्या कुटुंबांप्रती माझ्या संवेदना आहेत. जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

हेही वाचा:

 

Back to top button