हिंगोली : निषेध मोर्चा; जैन धर्मियांच्या सम्मेद शिखरजीला पवित्र तीर्थस्थळ म्हणून घोषित करा | पुढारी

हिंगोली : निषेध मोर्चा; जैन धर्मियांच्या सम्मेद शिखरजीला पवित्र तीर्थस्थळ म्हणून घोषित करा

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : झारखंडमधील जैन धर्मियांचे प्रसिद्ध असलेले सम्मेद शिखरजी (Sammed Shikharji) तीर्थस्थळ हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे त्याचे पावित्र्य धोक्यात आले आहे. या कारणामूळे निषेध मोर्चा काढण्यात आला. हा निषेध मुकमोर्चा सेनगाव येथील महावीर भवन येथून तहसील कार्यालायापर्यंत काळ्या फिती लावून काढण्यात आला. यावेळी सम्मेद शिखरजीला जैन पवित्र तीर्थस्थळ म्हणून घोषित करा अशी मागणी करण्यात आली.

 जैन धर्मियांची आस्था पायदळीत तुडविण्याचा मानस

सकाळी तीन वाजता अनवाणी पायाने मंदिराचे दर्शन पूजन करण्यासाठी भाविक मंडळी जात असतात. पण जोडीदारासह जोडे घालून मंदिरात फिरायला जाणारे पर्यटक ही परिस्थिती भविष्यात भयावह राहणार आहे. जैन धर्मियांची आस्था पायदळीत तुडविण्याचा केंद्र सरकारचा व झारखंड सरकारचा हा दृष्ट मानस आहे की काय असे वाटते? या क्षेत्रावर पशुहत्या करणे हा मोगल काळात गुन्हा ठरत होता. याची जाणीव आज सरकारमध्ये बसलेल्या व संस्कार संस्कृती जतन करणाऱ्या सरकारला नाही असे वाटते. जैन धर्मामध्ये 24 तीर्थंकराची मान्यता आहे. त्यापैकी 20 तीर्थंकराची सम्मेद शिखरजी मोक्षस्थळी आहे आणि अनंत मुनीरायांची तपोभूमी व मोक्षस्थळी आहे अशा पवित्र तीर्थस्थळाची विटंबना सरकारकडून होऊ नये व तेथील पावित्र्य अबाधित राहावे म्हणून सरकारने आदेश मागे घ्यावा व सम्मेद शिखरजी पवित्र जैन तीर्थस्थळ म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी या मोर्चा दरम्यान करण्यात आली.

जैन बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती

या मोर्चाला सेनगाव तालुक्यातील सेनगाव, पानकनेर गाव, साखरा, वटकळी, पुसेगाव, तळणी, नरसी, गोरेगाव, आजेगाव, माळसापुर, खांबा सिंगी, भानखेडा इत्यादी ठिकाणाहून जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेनगाव महावीर भवन ते तहसील कार्यालय सेनगाव पर्यंत काळ्या फिती लावून निषेध नोंदवत व सर्वांचे प्रतिष्ठाण बंद ठेवून मूक मोर्चात सामील झाले. तसेच तहसीलदार साहेबांना निवेदन सादर केले. मोर्चाचे नेतृत्व बालाजी जैन, सुभाष सोनटक्के, प्रभाकरराव जोगी सुधाकर जैन, इंदरलालजी जैन, देवेंद्रजी उखळकर, ओंकार लाजनकर, हिराचंदजी कानेड, सज्जन राऊत, महावीर बोराळकर, प्रभाकर उखळकर यांनी केले. रुपचंदजी संघई व अर्चना बोरळकर यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. तसेच घटनेचे गांभीर्य विषदही केले. या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी शरद संघई. निलेश जैन, सुशील उखळकर, राहुल सोनटक्के, रवींद्र बोराळकर, अमोल डांगे, देवानंद बोराळकर, आदेश पंचवटकर, मिलिंद डांगे, मधुकर नेटके, गणेश सोनटक्के, पारस काळे, केशरनाथ काळे, अक्षय नेटके, जितेंद्र जैन. सार्थक मुरकुंदे ओम वऱ्हाडे, दिनेश धोतरकर यांनी परिश्रम घेतले. सेनगाव तहसीलदाराच्या वतीने अंभोरे सरांनी निवेदन स्वीकारून मोर्चाच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.  हेमंत संघईनी सर्वांचे आभार व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता केली.

हेही वाचा

Back to top button