प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा, सासू मौरीन वाड्रांवर अटकेची टांगती तलवार, जमीन घोटाळाप्रकरणी उच्‍च न्‍यायालयाने याचिका फेटाळाली | पुढारी

प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा, सासू मौरीन वाड्रांवर अटकेची टांगती तलवार, जमीन घोटाळाप्रकरणी उच्‍च न्‍यायालयाने याचिका फेटाळाली

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिकानेरमधील जमीन खरेदी-विक्री फसवणूक प्रकरणी काँग्रेस पक्षाच्‍या सरचिटणीस  प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि त्‍यांच्‍या सासू आई मौरीन वाड्रा अडचणीत येण्याची शक्यता आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने या प्रकरणी त्‍यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. मात्र त्यांच्या अटकेला दोन आठवड्यांची मुदत दिली असल्‍याने त्‍यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंह यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, रॉबर्ट आणि त्यांच्या आई मौरीन यांना  या प्रकरणातील ‘ईडी’च्या तपासात सहकार्य करावे लागेल. अपील करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत अटकेवरील बंदी कायम राहणार आहे. हे प्रकरण बिकानेरमधील सरकारी जमिनीच्या खरेदी-विक्रीतील फसवणुकीशी संबंधित आहे. या प्रकरणी रॉबर्ट आणि त्याची आई मॉरीन यांच्या अटकेला यापूर्वी स्थगिती देण्यात आली होती.

दरम्यान, ईडीने रॉबर्ट वाड्रा आणि त्यांची आई मौरीन वाड्रा यांची कंपनी स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी यांच्याविरुद्ध बिकानेरच्या कोलायतमधील जमीन खरेदी-विक्री प्रकरणी कारवाई सुरू केली होती. २०१८ मध्ये वाड्रा यांनी ‘ईडी\च्या कारवाईला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात ८० हून अधिक सुनावणीनंतर एक सदस्‍यीय खंडपीठाने ईडीच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यानंतर ईडीकडून रॉबर्ट वाड्रा यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण

कोलायतमध्ये सरकारी जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी पोलिसांनी २०१८ मध्ये एफआयआर दाखल केला होता. यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान, सरकारी जमिनीची बनावट कागदपत्रे केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ईसीआर नोंदवला होता. स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी एलएलपी कंपनीच्या भागीदारांविरुद्ध ईडीने पुरावे गोळा करून रॉबर्ट आणि त्याची आई मॉरीन यांच्या अटकेसाठी याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने स्थगिती दिली.

सन २०१० मध्ये अधिकृत प्रतिनिधी म्हणून बिकानेर येथील कोलायत परिसरात असलेल्या खसरा क्रमांक ७११/४९९, ७१०/४९९ या १२० बिघा जमिनीची खरेदी करून रजिस्ट्री करण्यात आली होती. यासाठी रॉबर्ट वाड्रा आणि आई मौरीन वाड्रा यांनी धनादेश दिला. या धनादेशाद्वारे मध्यस्थ महेश नगर याने त्यांच्या चालकाच्या नावे जमीन खरेदी करून हा संपूर्ण घोटाळा केला होता. २०१४ मध्ये या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता.

हेही वाचलंत का ? 

Back to top button