दोन कोटींच्या पुस्तकांसाठी मोजले ३६ कोटी; रुपये खरेदीच्या चौकशीचे सरकारचे आश्वासन | पुढारी

दोन कोटींच्या पुस्तकांसाठी मोजले ३६ कोटी; रुपये खरेदीच्या चौकशीचे सरकारचे आश्वासन

नागपुर पुढारी वृत्तसेवा : सामाजिक विकास योजनेतून दलित वस्त्यांतील ग्रंथालयांसाठी चढ्या दराने पुस्तके खरेदी करण्यात आली. दोन कोटींची पुस्तके तब्बल ३६ कोटींना विकत घेण्यात आली. या सर्व प्रकरणाची चौकशी करून विधान परिषदेत वस्तुस्थिती मांडण्याचे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिले. जनता दल युनायटेडचे आमदार कपिल पाटील यांनी नियम २८९ अन्वये या पुस्तक खरेदीवर चौकशी करण्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडला. थेट ख्यातनाम प्रकाशकांकडून पुस्तकांची खरेदी न करता त्याचा मक्ता मे. शब्दालय पब्लिकेशन यांना चढ्या भावात देण्यात आला आहे. असा आक्षेप कपिल पाटील यांनी घेतला.

Back to top button