बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : बस सेवा पुरवण्यावरून आंदोलन करणाऱ्या काँग्रेस आमदाराला आपमानास्पद वागणूक दिल्या प्रकरणी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यानंतर प्रथम १२ वाजता त्यानंतर दुपारी १ वाजता अशी दोन वेळा सभा तहकूब करण्यात आली.
ग्रामीण भागात बस सेवा सुरळीत नाहीत, त्याचबरोबर कॉलेज, शाळा विद्यार्थ्यांना बस मिळत नाही, त्यामुळे त्यांना शाळेला सुट्टी घ्यावी लागत आहे. बसला लटकून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. याबाबत परिवहन मसहामंडळाचे मंत्री श्रीरामलू यांनी बस पुरेशा नाहीत, त्याचबरोबर रस्ते चांगले नसल्यामुळे बस सेवा देण्यात येत नसल्याचे सांगितले. यावरून काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले. त्यांनी सभापतीच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजीला प्रारंभ केला.
याचवेळी काँग्रेस नेते सिद्धरामय सभागृहात दाखल झाले. यावेळी सर्व आमदार आपापल्या असनाकडे निघून गेले. तेव्हा आ. रंगनाथ सिद्धरामय्यांना आंदोलनाबाबत माहिती देत असताना कायदामंत्री मधूस्वामी आणि पाटबंधारे मंत्री गोविंद कारजोळ यांनी रंगनाथ याचा एकेरी उल्लेख करून इथून जा, थांबलास तर बघ, अशी दमबाजी केल्यानंतर काँग्रेस सदस्य पुन्हा आक्रमक झाले. त्यांनी सभापतीच्या आसनासमोर जोरदार निदर्शने सुरू केली.
यावेळी हंगामी सभापती म्हणून काम पाहणारे कुमार बंगाराप्पा यांनी सुरुवातीला दहा मिनिटांसाठी सभा तहकूब केली. त्यानंतर एक तासाने सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला. एक वाजता सभेची कामकाज सुरू झाल्यानंतर हाच गोंधळ सुरू राहिल्याने पुन्हा सभापतींनी हा सभा तहकूब केली.
हेही वाचलंत का ?