मुक्ताईनगर मार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींची यांची माहिती | पुढारी

मुक्ताईनगर मार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींची यांची माहिती

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा- राज्यात जळगावमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महार्गावरील मुक्ताईनगर संदर्भात केंद्रीय परिवहन मंत्रालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. एनएच-७५३एल वर जळगाव तसेच मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शाहपुर बायपास ते मुक्ताईनगर मार्गाच्या चौपदरीकरणासाठी भारतमाला योजने अंतर्गत हायब्रीड अँन्युइटी मॉडेल (एचएएम) नुसार केले जाणार असून, यासाठी ७८४.३५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज ( दि. २०) ट्विट करीत यासंदर्भात माहिती दिली.

योजनेनूसार हा मार्ग भौगोलिक दृष्ट्या मध्यप्रदेशच्या बुऱ्हाणपूर जिल्हा तसेच महाराष्ट्रातील जळगाव मध्ये स्थित आहे. सध्या हा मार्ग दुपदरी कॅरेज्वे मार्ग एनएच-७५३एच चा एक भाग आहे. हा मार्ग पहुर जवळ एनएच-७५३एफ ला जोडतो. महाराष्ट्रातील जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर सह मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरला जोडणारा हा मार्ग आहे.

खंडवानजीक एनएच-३४७बी वरील जंक्शनवर समाप्त होतो. योजनेच्या मार्गात दापोरा, इच्छापूर तसेच मुक्ताईनगरमध्ये आवश्यक ठिकाणी बायपासची तरतूद करण्यात आली आहे. बोरगाव बुद्रुक ते मुक्ताईनगर पर्यंत संपूर्ण मार्ग चौपदरीकरण झाल्यानंतर इंदुर ते औरंगाबादच्या दिशेने जाणारी वाहतूक या मार्गाने वळवली जाईल,अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे.

 

 

Back to top button