आंबेगाव तालुक्यात किरकोळ अवकाळी पाऊस | पुढारी

आंबेगाव तालुक्यात किरकोळ अवकाळी पाऊस

मंचर; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यात काही भागात रविवारी (दि. 11) सायंकाळी अवकाळी तुरळक पाऊस झाला. यामुळे शेती पिकांवर रोगराई पडून शेती पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली. परिणामी शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बंगालच्या उपसागरातून उडणार्‍या मेंडोस चक्रीवादळामुळे दि. 11 ते 14 डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रातील काही ठिकाणी हवामानात बदल होऊन पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.

तालुक्यात सकाळपासूनच वातावरणात बदल होऊन ते ढगाळ झाले होते. सायंकाळच्या सुमारास काही भागात तुरळक तर काही ठिकाणी मध्यम प्रकारचा पाऊस झाला. या पावसाचा फटका तरकारी पिकांना बसणार आहे. चार ते पाच दिवस असेच वातावरण राहिल्यास पिकांवर रोगराई पडून पिके खराब होण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. काही ठिकाणी बटाटे काढण्याचे काम चालू आहे, तर कांदा चाळीतून कांदा पिशव्यात भरण्याचे काम चालू असल्यामुळे या तुरळक पावसामुळे शेतकर्‍यांची धांदल उडाली.

 

Back to top button