पिंपरी : 1980 बालकांना गोवर-रुबेला लसीचा डोस | पुढारी

पिंपरी : 1980 बालकांना गोवर-रुबेला लसीचा डोस

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरात गोवर रोगाचा शिरकाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका वैद्यकीय विभागाच्यावतीने आत्तापर्यंत 1 हजार 980 बालकांना गोवर रुबेला लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस देण्यात आलेला आहे. तर, 12 हजार 659 बालकांना ’व्हिटॅमिन ए’ची मात्रा देण्यात आली आहे.

शहरामध्ये आत्तापर्यंत गोवरचे 8 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 5 बालकांना गोवरची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कुदळवाडी भागातील ही बालके आहेत. महापालिकेच्या वतीने आत्तापर्यंत 1 लाख 10 हजार 701 घरांमध्ये याबाबत सर्वेक्षण करण्यात आले आहे. जवळपास 4 लाख 12 हजार 152 इतक्या लोकसंख्येचे त्याअंतर्गत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामध्ये 5 वर्षांखालील बालकांची संख्या 23 हजार 834 इतकी आहे.
                    – डॉ. पवन साळवे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

यंदा तीन वर्षांनंतर प्रथमच गोवरचे रुग्ण

शहरामध्ये 2019 ते 2021 या कालावधीत गोवरचे रुग्ण आढळले नव्हते. मात्र, यंदा प्रथमच गोवरचे संशयित आणि बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच, त्याविषयी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

Back to top button