Shraddha murder: श्रद्धा हत्या प्रकरणी 'डीएनए', पॉलीग्राफ टेस्टचे रिपोर्ट दिल्ली पोलिसांच्या हाती

पुढारी ऑनलाईन: श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी जंगलात सापडलेल्या हाडांचा डीएनए आणि पॉलीग्राफ या दोन्ही टेस्टचे रिपोर्ट दिल्ली पोलिसांच्या हाती आले आहेत, अशी माहिती तपास अधिकारी सागर प्रीत हुडा यांनी माध्यमांना दिली. या अहवालामुळे श्रद्धा हत्या प्रकरणी पोलिसांना पुढील तपासात मदत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Shraddha murder case | Police have received both (DNA & polygraph test reports) reports, this will help police in further investigation. The recovered body remains will be sent for post-mortem examination. The probe is underway: Sagar Preet Hooda, Special CP Law & Order, Delhi pic.twitter.com/vm1jgzCDb9
— ANI (@ANI) December 15, 2022
फ्लॅटवर सापडलेल्या मृतदेहाचे होणार शवविच्छेदन
सागर प्रीत हुडा यांनी म्हटले आहे की, सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (CFSL) कडून आम्हाला श्रद्धाची जंगलात सापडलेली हाडांचा डीएनए, तिच्या वडिलांचा डीएनए रिपोर्ट आणि आफताबची घेण्यात आलेली पॉलीग्राफ टेस्ट रिपोर्ट प्राप्त झाला आहे. हे अहवाल आम्हाला पुढील तपासात मदत करतील तिच्या फ्लॅटवर सापडलेल्या उर्वरित मृतदेहाचा भाग शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार असून, याची चौकशी सुरू असल्याची माहिती हुडा यांनी दिली.
जंगलात सापडलेली हाडे श्रद्धाचीच, नमुने वडिलांच्या DNA शी जुळले
श्रद्धा हत्या प्रकरणी दिल्लीच्या जंगलात आरोपी आफताबने टाकलेले श्रद्धाच्या शरीराचे तुकडे दिल्ली पोलिसांकडून गोळा करण्यात आले होते. याप्रकरणातील मोठा खुलासा सुत्रांकडून करण्यात आला आहे. तिच्या काही हाडांचे नमुने हे तिच्या वडिलांच्या DNA शी जुळले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
हेही वाचा:
- Shraddha murder : श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी आफताबने वापरला चायनिज चाॅपर
- Shraddha murder case : आफताब आणि त्याच्या कुटुंबियांना कठोर शिक्षा व्हावी : श्रद्धाचे वडील विकास वालकर
- Shraddha murder case : श्रद्धा हत्या प्रकरणी मोठी बातमी; जंगलात सापडलेली हाडे श्रद्धाचीच, नमुने वडिलांच्या DNA शी जुळले