Railway travel concession : ज्येष्ठ नागरिक, पत्रकारांना रेल्वे प्रवास सवलत नाही

Railway travel concession
Railway travel concession

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा;

ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकारांना रेल्वे प्रवासात कसलीही सवलत देण्यात येणार नाही, असे दळणवळण आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी स्पष्ट केले. (Railway travel concession ) कोव्हिड-१९ च्या काळात या सवलती देण्यात आल्या होत्या. आता त्या मागे घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी दोन पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना, त्यांनी आवर्जून सांगितले की, आधीच एकूण ५९ हजार कोटी रुपयांच्या सबसिडीच्या रूपात ५५ टक्के सवलती देण्यात येत आहेत. जुन्या सवलती पुन्हा सुरू केल्यास रेल्वेच्या इतर कामांवर परिणाम होईल. ते म्हणाले की, रेल्वे आधीच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वार्षिक ५ हजार कोटी रुपये पेन्शन म्हणून आणि आणखी ९० हजार कोटी रुपये कर्मचाऱ्यांना पगार म्हणून देत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news