Maharashtra-Karnataka : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर शहांचे मोठे विधान, म्हणाले; ‘सुप्रीम कोर्टाचा निर्णय..’ | पुढारी

Maharashtra-Karnataka : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर शहांचे मोठे विधान, म्हणाले; ‘सुप्रीम कोर्टाचा निर्णय..’

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुप्रिम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोणतेही राज्य सरकार यावर दावा करणार नाही. दोन्ही राज्याची एक समिती आयोजित केली जाईल. कायदा व सुवव्यवस्था राखण्यासाठी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. (Maharashtra-Karnataka)

सीमावादाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रातील चर्चेचा विषय आहे. गेले काही दिवस या विषयामुळे अनेक भागांमध्ये आंदोलने झाली. याच महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद मुद्दयांवर बुधवारी (दि. १४) गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली. ही बैठक दिल्ली येथील संसद भवनात पार पडली.

सीमावादाला राजकीय मुद्दा बनवू नये असे आवाहन विरोधी पक्षांना गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. ट्विटर चुकीची माहिती पसरवल्यामुळे दोन्ही राज्यात वाद निर्माण झाली आहे. ३-३ मंत्र्यांची समिती या समस्या सोडविण्यासाठी नेमली जाईल. या सर्व परिस्थितीची जबाबदारी एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यावर सोपविली जाईल. अशी माहिती शहा यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button