पुढारी ऑनलाइन डेस्क : हिमाचल प्रदेशचे निवडणूक निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने बहुमताच्या जवळ पोहोचले आहे. अद्याप संपूर्ण निकाल घोषित होणे बाकी आहे. मात्र तरी हाती आलेल्या निवडणूक कल चाचणीवरून काँग्रेसने बहुमत प्राप्त केले असल्याचे चित्र आहे. काँग्रेस 38 तर भाजप 27 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे हिमाचलमध्ये भाजप आपले ऑपरेशन लोटस राबवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेसने या ऑपरेशन लोटसची धास्ती घेतली आहे. सर्व विजयी आमदारांना तातडीने राजस्थानला हलवणार आहे.
काँग्रेसची खास रणनीति
सूत्रांच्या माहितीनुसार, हिमाचलमध्ये बहुमताच्या जवळ पोहोचल्यानंतर हिमाचलसाठी काँग्रेसने खास रणनीती बनवण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसने विजयी विधायकांना राजस्थानला शिफ्ट करण्याची योजना आखली आहे.
यासाठी प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी राजस्थानमध्ये पोहोचल्या आहेत. तर छत्तीसगढमधून मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि राजीव शुक्ला हिमाचल प्रदेशसाठी रवाना झाले आहे.
हे ही वाचा :