Supreme Court Mobile App 2.0 : ‘सुप्रीम कोर्ट मोबाईल ॲप २.० ची सरन्यायाधीशांकडून घोषणा

सर्वोच्च न्यायालय:
सर्वोच्च न्यायालय:

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : प्रलंबित खटल्यांची स्थिती तसेच 'रिअल टाईम एक्सेस'साठी सर्वोच्च न्यायालयाने एक खास ॲप (Supreme Court Mobile App 2.0) तयार केले आहे. लवकरच या ॲपचा शुभारंभ केला जाईल. 'सुप्रिम कोर्ट मोबाईल ॲप २.० हे नवीन ॲप सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा बुधवारी (दि.७) सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी केली. वकिलांनी या ॲपचा वापर करण्याचे आवाहन देखील सरन्यायाधीशांनी केले आहे. सध्या अँन्ड्रॉईड फोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असलेले हे ॲप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करता येईल.

आयओएस वापरकर्त्यांसाठी आठवड्यात हे ॲप्लिकेशन (Supreme Court Mobile App 2.0) वापरासाठी उपलब्ध होईल. ॲपच्या सहाय्याने सर्व विधी अधिकारी खटल्यांची 'रिअल टाईम एक्सेस' करू शकतील, अशी सुविधा यंदा उपलब्ध करवून देण्यात आली आहे. या सोबतच सरकारी विभागांना देखील त्यांच्याशी संबंधित प्रलंबित खटल्यांची सद्य स्थितीसंबंधी माहिती ॲपमधून मिळेल, अशी माहिती सरन्यायाधीशांनी कोर्टरूमला दिली.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news