Delhi MCD Election Results Live: आपने बहुमताचा आकडा गाठला;आप १०६ तर भाजपला ८४ जागा | पुढारी

Delhi MCD Election Results Live: आपने बहुमताचा आकडा गाठला;आप १०६ तर भाजपला ८४ जागा

पुढारी ऑनलाईन : दिल्ली महापालिका निवडणुकीचा (Delhi MCD Election Results Live) निकाल आज बुधवारी (दि.७) जाहीर होत आहे. यासाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात ४२ केंद्रावर मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत ९०% मतांची मोजणी झाली आहे. यामध्ये एमसीडी मतमोजणीच्या आतापर्यंत आलेल्या निकालानुसार आपने बहुमताचा आकडा गाठला आहे. यामध्ये आप १०६ ,भाजप ८४ तर काँग्रेसला ५ जागांवर विजय मिळाला आहे.

निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप आणि आप या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 250 उमेदवार उभे केले आहेत. तर काँग्रेसचे 247 आणि बहुजन समाज पक्षाचे 132 उमेदवार निवडणूकीच्या रणांगणात आहेत. दिल्लीत 4 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत 50.48 टक्के मतदान झाले.

याठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्रीय सशस्त्र बलाच्या २० कंपन्या तसेच १० हजार पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहेत. शास्त्री पार्क, यमुना विहार, मयुर विहार, नंदनगरी, द्वारका, ओखला, मंगोलपुरी, पितमपुरा, अलीपूर तसेच मॉडल टॉऊन परिसरातील मतमोजणी केंद्रांना (Delhi MCD Election Results Live) छावणीचे स्वरूप आले आहे.

2017 च्या निवडणुकीत भाजपने 270 पैकी 181 वॉर्ड प्रभागात वर्चस्व मिळवले होते, AAP ने 48 तर कॉंग्रेसने 27 वॉर्डात आपले वर्चस्व मिळवले होते. मतमोजणी सुरू असलेला एमसीडीचा निकाल आज दुपारी ३ वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

१५ वर्षानंतर महापालिकेत आम आदमी पक्ष सत्तारूढ होण्याची शक्यता

सोमवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आलेल्या बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी पालिकेत यंदा आम आदमी पक्ष सत्तारूढ होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. आप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. १५ वर्षानंतर महापालिकेत सत्तांतराची शक्यता असल्याचा कल या मतदानोत्तर चाचण्यातून दिसून आला आहे. त्यामुळे भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Delhi MCD Election Results Live)

Delhi MCD Election Results Live

  • AAP चे ट्रान्सजेंडर उमेदवार बोबी हे सुलतानपुरीमधून विजयी
  • जामा मस्जिद वॉर्डातून आपच्या सुलताना आबाद विजयी 
  • सारिका चौधरी यांनी काँग्रेसच्या फरहाद सूरी यांचा २४४ मतांनी पराभव करत, दर्यागंज वॉर्डातून विजय मिळवला. 
  • लक्ष्मी नगरमध्ये भाजपच्या अलका राघव 3,819 मतांनी विजयी झाल्या.
  • रणजीत नगर मतदारसंघातून आपचे अंकुश नारंग विजयी

हेही वाचा:

Back to top button