कोल्हापूर : बेळगाव दौरा रद्द केल्‍याने चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाईंचा ठाकरे गटाकडून निषेध | पुढारी

कोल्हापूर : बेळगाव दौरा रद्द केल्‍याने चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाईंचा ठाकरे गटाकडून निषेध

कागल; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकात जाण्याची घोषणा करूनही मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई कर्नाटकात गेले नाहीत. त्याबद्दल त्यांच्या प्रतिमेला ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी हळद- कुंकू वाहून  बांगड्यांचा आहेर देऊन आज (दि. ६) निषेध व्यक्त केला.

सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र – कर्नाटक राज्यात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, महाराष्ट्र- कर्नाटक राज्याच्या सीमेवरील दूधगंगा नदीजवळ पोलिसांचेकडे तोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे आणि संजय पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी कर्नाटकात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी सर्वांची धरपकड करून त्यांना ताब्यात घेतले.

या आंदोलनामध्ये महिला देखील सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्राचे मंत्री व सीमा समन्वयक समितीचे सदस्य चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई बेळगावला जाणार होते. मात्र, त्यांचा दौरा रद्द झाल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. विजय देवणे, संजय पवार यांनी कर्नाटकात घुसण्याचा प्रयत्न केला. तर महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला हळद कुंकू लावून निषेध व्यक्त केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button