विकृतीची कबुली… गुजरातमधील पैलवानाने केला १०० हून अधिक महिलांचा विनयभंग!, मारहाण करुन घटनास्‍थळावरुन करत असे पोबारा

विकृतीची कबुली… गुजरातमधील पैलवानाने केला १०० हून अधिक महिलांचा विनयभंग!, मारहाण करुन घटनास्‍थळावरुन करत असे पोबारा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गुजरातमधील राज्‍यस्‍तरीय कुस्‍ती स्‍पर्धेतील विजेता राजकोट येथील पैलवानला विनयभंग प्रकरणी अटक करण्‍यात आली आहे. पोलिस चौकशीत त्‍याने आतापर्यंत राजकोट शहरातील १०० पेक्षा अधिक महिलांना मारहाण करत विनयभंग केल्‍याची कबुली दिली आहे. महिलांना मारहाण करुन आपल्‍याला मानसिक आनंद मिळत असल्‍याची धक्‍कादायक कबुलीही त्‍याने दिली असून, त्‍याच्‍या या कबुलीजबाबाने पोलिसही हादरले आहेत.

सलग चार वर्ष राज्‍यस्‍तरीय विजेता

'टाईम्‍स ऑफ इंडिया'ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, विनयभंग प्रकरणी अटक करण्‍यात आलेल्‍या २४ वर्षीय पैलवानाचे नाव कौशल पिपलिया असे आहे. त्‍याने ७४ किलो वजन गटात १०१६, १७, १८ आणि १९ अशी सलग चार वर्ष राज्‍यस्‍तरीय स्‍पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे.

योगा शिक्षिकेच्‍या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

योगा शिक्षकेने आपला विनयभंग झाल्‍याची तक्रार मालवीयनगर पोलीस ठाण्‍यात २३ नोव्‍हेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. यानंतर कौशल पिपलिया दहा दिवसांपासून बेपत्ता होता. योगा शिक्षिकेने तक्रारीत म्‍हटलं होतं की, तिने दुचाकी पार्क केलेल्‍या पार्किंगमध्‍ये मास्‍क घातलेला तरुण बसला होता. तो तिच्‍या मागे लिप्‍टपर्यंत आला. लिफ़्‍टचा दरवाजा बंद करण्‍यास रोखले. यानंतर तिच्‍याकडे पाहून अश्‍लील हावभाव केले. पीडितेने कौशलला लिफ्टमधून बाहेर ढकलण्‍यचा प्रयत्‍न केला तेव्‍हा त्‍याने तिला मारहाण करत तिचा गळा दाबण्‍याचा प्रयत्‍न केला. पीडितेने आरडाओरडा केल्‍यानंतर तो घटनास्‍थळावरुन पळून गेला.

 मारहाण करुन मिळत असे मानसिक आनंद : विकृतीची कबुली

या प्रकरणी मालवीयनगरचे पोलीस निरीक्षक आय. एन. सावलिया यांनी सांगितले की, विनयभंग प्रकरण कौशल पिपलिया याला अटक करण्‍यात आली आहे. त्‍याने आजवर १०० हून अधिक महिलांचा विनयभंग केल्‍याची कबुली दिली आहे. या विकृत कृत्‍यातून त्‍याला आनंद मिळत होता. अनेक पीडितांनी तक्रार केले नसल्‍याने त्‍याचे धाडस वाढले. दुचाकी चालविणार्‍या महिलांना थोबाडित मारुन तो घटनास्‍थळावरुन पळून जात असे. त्‍याला यापूर्वी चोरी आणि शस्‍त्रास्‍त्र बंदी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.

मास्‍क घालून कृत्‍य

कौशल पिपलिया हा राजकटोमधील शैक्षणिक संस्‍था असणार्‍या रस्‍त्‍यांवर पहाटेच्‍या वेळी महिला व तरुणींसमोर अश्‍लील हावभाव फिरत असे. आपली ओळख लपविण्‍यासाठी तो नेहमी चेहरा मास्‍कने झाकत असे. त्‍यामुळे त्‍याचा माग काढणे पोलिसांना कठिण झाले होते.

तब्‍बल १५०० सीसीटीव्‍ही फुटेजची तपासणीनंतर आरोपी पोलिसांच्‍या जाळ्यात

मास्‍क घालून एक तरुण महिला व तरुणींचा विनयभंग करत असल्‍याच्‍या तक्रारी पोलिसांपर्यंत आल्‍या होत्‍या. मात्र याप्रकरणी २३ नोव्‍हेंबरला पीडितेने तक्रार दाखल केली. विकृत तरुणचा शोध घेण्‍यासाठी राजकोट पोलिसांनी चार विशेष पथके तयार केली. पोलिसांनी शहरातील सर्व रस्‍त्‍यांवरील सीसीटीव्‍ही फुटेजची पाहणी सुरु केली. शहरातील शॉपिंग मॉल्‍स, दुकाने, उच्‍चभ्रू रहिवासी ठिकाणे येथील तब्‍बल १५०० सीसीटीव्‍ही फुटेजची सखोल तपासणी करण्‍यात आली. यामध्‍ये भक्‍तीनगर येथील देवपारा सोसायटीजवळ संशयित अनेकवेळा मास्‍क घालून फिरताना दिसला. पोलिसांनी याच भागावर फोकस करुन पिपलिया याच्‍या मुसक्‍या आवळल्‍या. त्‍याला पोलिसी खाक्‍या दाखवताच त्‍याने आजपर्यंत तब्‍बल १०० हून अधिक महिलांना मारहाण करत विनयभंग केल्‍याची कबुली दिली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news