Banking Balance : खात्यात ‘शून्य’ बॅलेन्स असतानाही खात्यातून पैसे कसे काढू शकता, जाणून घ्या सविस्तर…

Banking Balance : खात्यात ‘शून्य’ बॅलेन्स असतानाही खात्यातून पैसे कसे काढू शकता, जाणून घ्या सविस्तर…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Banking Balance : सर्व सामान्य माणसांच्या आयष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा त्याला पैशांची तातडीची गरज असते. मग ही गरज भागवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रांकडून पैसे उधार घ्यावे लागतात. तर काही वेळेला व्याजावर पैसे घ्यावे लागतात. तुमच्या बँक खात्यात जेव्हा शिल्लक नसते. तुम्हाला पैशांची खूप जास्त गरज असते आणि अशा वेळी तुम्हाला खात्यात शिल्लक नसतानाही दहा हजार रुपयांपर्यंत पैसे काढता आले तर… तुमची ऐनवेळची गरज निश्चित भागवली जाईल.

Banking Balance : 'जनधन' खात्याने सर्व सामान्य जनतेसाठी ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली आहे. या सुविधेअंतर्गत तुम्हाला कोणत्याही अटीशिवाय दोन हजार रुपये काढता येतील अशी परवानगी दिली आहे. तर काही नियम आणि अटींसहित 10 हजार रुपयांपर्यंत ही सुविधा देण्यात आली आहेत.

Banking Balance : ओव्हरड्राफ्टची संकल्पना काय आहे?

जनधन खाते देत असलेली ओव्हरड्राफ्टची सुविधा ही जुनीच संकल्पना आहे. तुमच्या बँक खात्यात पैसे नसतानाही त्यातून तुम्ही मर्यादित स्वरुपात पैसे काढू शकता. तुम्ही किती पैसे काढू शकता त्यावर बँक किती व्याज आकारणार हे बँक आणि खातेदाराची आर्थिक परिस्थिती यावर अवलंबून असते.

Banking Balance : तसेच ओव्हरड्राफ्ट घेतल्यानंतर ती रक्कम किती दिवसांत परत करायची तसेच त्यावर किती व्याज आकारायचे हे देखील प्रत्येक बँकेचे नियम वेगवेगळे आहेत. पूर्वी या सुविधेचा वापर मोठ्या प्रमाणात फक्त व्यापारी वर्गच करायचा. मात्र, नंतर-नंतर अन्य नोकरदार वर्गानेही या सुविधांचा उपभोग घेणे सुरू केले होते. मात्र, सर्व सामान्यमाणूस या सुविधेपासून तसा लांबच होता.

बँकेची हीच ओव्हरड्राफ्टची सुविधा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 'जनधन' खात्याशी जोडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस या सुविधेबाबत विचार करू लागला आहे. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात शून्य बॅलेन्सवर जनधन खाते उघडता येण्याची सुरुवात केली होती. फायनान्शिअल एक्सप्रेसने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात सप्टेंबर 2022 पर्यंत 46.25 कोटीपेक्षा जास्त लोकांनी जनधन खाते उघडले आहे. त्यात 1.72 लाख कोटी रुपये जमा आहे.

Banking Balance : जनधन खात्यातून ओव्हरड्राफ्टची सुविधा कोण घेऊ शकते?

ज्या लोकांनी जनधन खाते उघडले आहे आणि ज्यांनी आपले आधारकार्ड जनधन खात्याशी लिंक केले आहे. त्यांना 6 महिन्यानंतर ओव्हरड्राफ्टची सुविधा घेऊ शकतात. दोन हजार रुपयापर्यंतच्या ओव्हरड्राफ्टसाठी कोणत्याही अटी नाहीत. मात्र, 10 हजार रुपयापर्यंतची रक्कम काढण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. त्यामध्ये तुमचे खाते 6 महिने सतत सुरू असले पाहिजे. तसेच यासाठी कुटुंबातील एकच सदस्य पात्र असून ही सुविधा फक्त कुटुंबातील कमावत्या व्यक्तीला, विशेषतः स्त्रीला दिली जाते.

Banking Balance : जनधन खात्याचे अन्य फायदे

जमा रकमेवर चांगले व्याज मिळते

खात्यासह फ्री मोबाइल बँकिंग सुविधा दिली जाते

जनधन खाता असेल तर तुम्ही ओव्हरड्राफ्टच्या माध्यमातून आपल्या खात्यातून 10000 रुपयापर्यंतची रक्कम शून्य रक्कम असतानाही काढू शकतात.

2000 रुपयापर्यंतच्या ओव्हरड्राफ्टसाठी कोणतीही अट नाही

दोन लाख रुपयांपर्यंत अॅक्सिडेंटल इन्शूरन्स देण्यात येणार आहे

30,000 रुपयापर्यंतचे लाइफ कवर इन्शूरन्स जो लाभार्थीच्या मृत्यूनंतर सर्व पात्रता पूर्ण केल्यावर मिळते.

जनधन खाता उघडणा-याला रुपे डेबिट कार्ड दिले जाते खात्यातून पैसे काढण्यासाठी किंवा खरेदीसाठी हे वापरले जाऊ शकते

कोणत्याही सरकारी योजनेचे थेट लाभ या खात्यांमध्ये जमा होतात

देशभरात कुठेही पैसे ट्रान्सफर करू शकतात

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news