Nora Fatehi : सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोरा फतेहीची पाच तास चौकशी | पुढारी

Nora Fatehi : सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोरा फतेहीची पाच तास चौकशी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर याच्या कथित २०० कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नोरा फतेही (Nora Fatehi) हिची दिल्लीत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तब्बल पाच तास चौकशी केली. भौतिक पुराव्याच्या आधारे नोराला ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. यापूर्वी देखील नोराची ईडीने चौकशी केली होती. शुक्रवारी पाचव्यांदा नोरा चौकशीसाठी हजर राहीली. १५ सप्टेंबरला याप्रकरणात तिची चौकशी करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा सुकेश प्रकरणाशी संबंधित सर्वांवर लक्ष ठेवून आहे. नुकतीच दिल्ली पोलिसांनी सुकेशची मॅनेजर पिंकी इराणीला अटक केली आहे.
यापूर्वी झालेल्या चौकशी दरम्यान नोरा आणि पिंकीला एकमेकांसमोर बसवून अधिकाऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार केला होता, अशी माहिती समोर आली होती. जवळपास ५ तास चाललेल्या चौकशीदरम्यान नोराला सुकेश तसेच त्याच्या पैशासंबंधी बरेच प्रश्न विचारण्यात आले होते. आतापर्यंतच्या चौकशीदरम्यान नोरोन सुकेशकडून महागड्या भेटवस्तू स्वीकारल्याचे कबुल केले आहे. पंरतु,त्याच्या गुन्हेगारी कृत्यासोबत कुठलाही संबंध नसल्याने नोराने स्पष्ट केले होते. (Nora Fatehi)
चौकशी दरम्यान नोरा यांचे बयाण नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची देखील सखोल चौकशी करण्यात आली आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलीनला आरोप बनवले आहे. गेल्या महिन्यात तिला २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर तसेच अमानत रक्कमेवर जामीन देण्यात आला होता. पिंकीनेच जॅकलीनची सुकेश सोबत भेट घडवून आणली होती. घोटाळेबाज सुकेशने जॅकलीन तसेच नोराला अनेक लक्झरी कार आणि महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या.

हेही वाचलंत का?

Back to top button