Osama Bin Laden : दहशतवादी लादेनने रासायनिक शस्त्रांची चाचणी कुत्र्यांवर केली होती – मुलाची माहिती | पुढारी

Osama Bin Laden : दहशतवादी लादेनने रासायनिक शस्त्रांची चाचणी कुत्र्यांवर केली होती - मुलाची माहिती

मुलगा ओमर याने मुलाखतीती दिली माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बीन लादेन याने रसायनिक शस्त्रांची चाचणी कुत्र्यांवर घेतली होती, अशी माहिती ओसामाचा मुलगा ओमर याने दिली आहे. द सन या वृत्तपत्रात ही मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे. ओमर हा ओसामाचा चौथा मुलगा आहे. ओमर आणि त्याची बायको फ्रान्समधील नॉर्मंडी येथे राहातात. (Osama Bin Laden tested chemical weapons)

“मी लहान असताना, वडिलांनी मला शस्त्र चालवण्यासाठी शिकवले होते. मी अल कैदात काम करावे अशी त्यांची इच्छा होती. या सगळ्या प्रकरणात मी पीडित होतो आणि आता या कटू आठवणी विसरण्याचा प्रयत्न करत आहे,” असे ओमर याने या मुलाखतीत म्हटले आहे.
“एप्रिल २००१ला मी अफगाणिस्तान सोडले. मी वडिलांना निरोप दिला, त्यांनीही मला निरोप दिला. मी अफगाणिस्तान सोडत आहे, हे त्यांना आवडले नव्हते,” असे ओमर याने सांगितले.

‘रासायनिक शस्त्रांची चाचणी झाली होती’

“वडिलांच्या निकटवर्तियांनी रसायानिक शस्त्रांची चाचणी घेतली होती, ते मी पाहिले होते. त्यांनी माझ्या पाळीव कुत्र्यावर चाचणी घेतली होती, मला ते आवडले नव्हते. वडिलांनी मला अल कायदामध्ये सामिल होण्याबद्दल कधी सांगितले नव्हते. पण त्यांचे काम पुढे नेण्यासाठी माझी निवड झाली आहे, असे ते म्हणायचे. पण या कामासाठी मी अयोग्य आहे, असे त्यांना सांगितले, त्यामुळे ते नाराज झाले होते.”
अमेरिकी सैन्याने विशेष मोहिमेत ओसामा बीन लादेनला ठार मारले, तेव्हा ओमर कतारमध्ये होता.

‘वडिलांचा मृतदेह मिळायला हवा होता’

“वडिलांचा मृतदेह अंत्यविधीसाठी मिळायला हवा होता. पण तो त्यांनी दिला नाही. वडिलांचा मृतदेह समुद्रात फेकल्याचे ते सांगतात, पण माझा त्यावर विश्वास नाही,” असे ओमर याने म्हटले आहे.

हेही वाचा

Back to top button