World AIDS Day 2022 : HIV वर अद्याप लस का नाही ? जाणून घ्या काय आहेत कारणे

World AIDS Day 2022
World AIDS Day 2022
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : कोरोनासारख्या आजारावर संशोधकांनी काही महिन्यात व्हॅक्सिन शोधलं; पण HIVवर (World AIDS Day 2022) गेली चार दशकं संशोधक लस शोधत आहेत मात्र यावर अजूनही यश आलेले नाही. असे का झाले असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? याचं शास्त्रीय उत्तर HIV च्या रचने दडलेले आहे. इंटरनॅशनल एड्स लस इनिशिएटिव्ह (IAVI) नुसार, व्हायरसच्या स्वरूपामुळे, अनेक दशके काम करूनही संशोधक प्रभावी HIV लस तयार करण्यात अयशस्वी ठरले असल्याचे म्हटले आहे. Medical News Today या वेबसाईटवर याची शास्त्रीय माहिती देण्यात आली आहे ती जाणून घेवूया.

World AIDS Day 2022: सातत्याने व्हायरसमधील बदल

HIV याचा अर्थ Human Immunodeficiency Virus होय. हा व्हायरस स्वतःमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करतो. ज्या व्यक्तीला HIVची बाधा झालेली आहे, त्याच्या शरीरात HIVच्या वेगवेगळ्या रिप्लिका तयार होऊ शकतात. या व्हायरसच्या स्वरूपात वारंवार बदल होत असल्याने यावर संशोधन करणे अवघड आहे. HIV चा हा व्हायरस स्थिर रहात, नसल्याने संशोधकांनाही यासंदर्भात स्थिरपणे विचार किंवा संशोधन करण्यात (World AIDS Day 2022) येत नाही.

रोगप्रतिकारक निर्मितीस अडथळा

बहुतेक HIV व्हायरसच्या पृष्ठभागावर साखरेचा रेणूंचा थर जमा झालेला असतो. ज्यामुळे रोगप्रतिकारके प्रतिक्रिया होण्यास अडथळा निर्माण होतो. लसीला प्रतिसाद देणाऱ्या रोगप्रतिकारकांची केंद्रके निर्माण होणे आवश्‍यक असते; पण ही रोगप्रतिकारकेच एचआयव्ही बाधित व्यक्तित निर्मित होत नसल्याने, आत्तापर्यंत या लसीला परिणाम दिसून आलेला नाही.

World AIDS Day 2022: व्हायरसवरील अवरण

HIV वर ग्यालकोप्रोटिनचे अवरण असते. अवरण असलेल्या कुळातील हा व्हायरस आहे. ग्लायकोप्रोटिन याचा अर्थ साखर आणि प्रोटिनेचे अवरण होय. हे अवरण HIVचं शरीरातील अँटिबॉडिजपासून संरक्षण करतील.

भिन्न प्रकारच्या रिप्लिकांची निर्मिती

व्हॅक्सिनचं काम असते की शरीरात एखाद्या विषाणू किंवा जीवाणू विरोधात रोगप्रतिकार शक्तीला गती देणे. HIV च्या एकाच शरीरात विविध रिप्लिका तयार होत असतात. य़ा रिप्लिका एकसारख्या असत नाहीत, त्यामुळे व्हॅक्सिन त्या विरोधात निष्प्रभ होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news