सीमेपलीकडील इसिस प्रेरित दहशतवादाचा मानवतेला धोका : अजित डोभाल | पुढारी

सीमेपलीकडील इसिस प्रेरित दहशतवादाचा मानवतेला धोका : अजित डोभाल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सीमेपलीकडील दहशतवाद तसेच इसिस (आयएसआयएस) प्रेरित दहशतवाद मानवतेसाठी धोका आहे, अशी चिंता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांनी आज (दि.२९) व्यक्त केली. भारत तसेच इंडोनेशियात शांती तसेच सामाजिक सौहार्दाची संस्कृती उभारण्यात उलेमांच्या भूमिकेवर दिल्लीत आयोजित एका संमेलनात ते बोलत होते. दोन्ही देश दहशतवाद आणि फुटीरतावादाचा बळी ठरले आहेत. परंतु, भारताने या आव्हानांवर मोठ्या प्रमाणात मात केली आहे. मात्र, सीमेपलीकडली दहशतवाद आणि इसिस प्रेरित दहशतवाद अजूनही धोका असल्याचे डोभाल म्हणाले.

इसिस प्रेरित वैयक्तिक दहशतवाद सेल आणि सीरिया-अफगानिस्तान मधून परतलेल्या दहशतवाद्यांच्या धोक्याचा सामना करण्यासाठी नागरी समाजाचे आपसी सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. भारत आणि इंडोनेशियातील उलेमा तसेच धार्मिक नेत्यांना सोबत आणणे, सहनशीलता, सौहार्द आणि शांतीपूर्ण सह-अस्तित्वाला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य वृद्धिंगत करण्याचा उद्देश या संमेलनाचा असल्याचे डोभाल यांनी स्पष्ट केले.

अतिरेकी, कट्टरतावाद आणि धर्माचा चुकीचा वापर कोणत्याही आधारावर स्वीकारता येणार नाही. शांती आणि सुरक्षितता असा इस्लामचा अर्थ आहे. अशात अतिरेकी आणि दहशतवाद इस्लाम विरोधी आहेत. या शक्तीविरोधाला कुठल्याही धर्माविरोधात बघू नये. हे एक षड्यंत्र आहे. याऐवजी आपल्या धर्मातील खऱ्या संदेशावर लक्ष दिले पाहिजे. मनुष्याची हत्या संपूर्ण मानवतेची हत्या आहे, पंरतु एका मनुष्याला वाचवणे मानवतेला वाचवण्यासारखे आहे, असे पवित्र कुराण शिकवते.

इस्लामनुसार सर्वोच्च जिहाद ‘जिहाद अफजल’ आहे. मनुष्याला त्याच्या इंद्रियांवर अथवा त्यांच्या अहंकारावर विजय मिळवण्यासाठी हा जिहाद आहे. जिहाद निरागस नागरिकांविरोधात नाही, असे डोभाल म्हणाले. एनएसए डोभाल यांच्या आमंत्रणावर इंडोनेशियाचे प्रमुख मंत्री मोहम्मद महफूद एमडी दिल्लीत दाखल झाले आहेत. महफूद इंडोनेशियात राजकीय, कायदे तसेच सुरक्षेसंबंधी प्रकरणाचे समन्वय करणारे प्रमुख मंत्री आहेत. त्यांच्यासोबत उलेमांचे एक उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ देखील दिल्लीत आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button