US company Layoff : उद्यापासून कामावर येऊ नका, अमेरिकेतील फर्निचर कंपनीनं २,७०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं | पुढारी

US company Layoff : उद्यापासून कामावर येऊ नका, अमेरिकेतील फर्निचर कंपनीनं २,७०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं

पुढारी ऑनलाईन डेस्क :  अमेरिकेतील एका फर्निचर कंपनीने तब्बल २,७०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. कंपनीने सांगितले उद्यापासून कामावर यायची गरज नाही. या कंपनीने थँक्सगिव्हिंग डेच्या (Thanksgiving Day 24 नोव्हेंबर) दोन दिवस आधी युनायटेड फर्निचर इंडस्ट्रीजने हजारो लोकांना बेरोजगार केले (US company Layoff) आहे. ही कंपनी मिसिसिपी (Mississippi ) येथे आहे.

एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानूसार, मिसिसिपी (Mississippi ) येथील फर्निचर कंपनीने २१ नोव्हेंबर रोजीच्या मध्यरात्रीपूर्वी २,७०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. या कंपनीने कर्मचार्‍यांना मेसेज आणि ईमेलद्वारे  त्यांना दुसऱ्या दिवशी कामावर न येण्यास सांगितले. ही कंपनी बजेट-फ्रेंडली सोफा आणि रिक्लिनर्स बनवण्यासाठी ओळखली जाते. कंपनीच्या या निर्णयाने कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. एका निर्णयाने हजारो लोकांना बेरोजगार केले.

US company Layoff : खेद होत आहे

न्युयॉर्क पोस्टनुसार, कंपनीने कर्मचार्‍यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, “संचालक मंडळाच्या सूचनेनुसार, आम्हाला तुम्हाला कळविण्यास खेद होत आहे. अनपेक्षित व्यावसायिक परिस्थितीमुळे कंपनीला हे करणे भाग पडले आहे. सर्व कर्मचार्‍यांना नोकरीवरुन काढून टाकण्याचा कठीण निर्णय घेतला आहे.” पुढे असेही म्हणाले आहे की, “कंपनीतून तुम्हाला काढून टाकणे कायमस्वरूपी आहे आणि तुम्हाला मिळणारे सर्व फायदे तात्काळ संपुष्टात आणले जातील,” कंपनीने आपल्या ड्रायव्हर्सना ताबडतोब “उपकरणे, इन्व्हेंटरी आणि डिलिव्हरी दस्तऐवज परत करण्याचे निर्देश दिले आहेत.

कंपनीने कोणतेही सबळ कारण स्पष्ट केलं नाही

कर्मचाऱ्यांना अचानक का कामावरून काढून टाकण्यात आले. याचे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. दोन दशके जुन्या असलेल्या कंपनीने अचानक आपले कामकाज स्थगित केले आहे. न्युयॉर्क पोस्टच्या अहवालात असे म्हटले आहे की उन्हाळ्यात, कंपनीने आपले मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वित्तीय अधिकारी आणि विक्रीचे कार्यकारी उपाध्यक्ष यांना काढून टाकले होते.

US company Layoff : कर्मचाऱ्यांकडून निराशा व्यक्त

कामावरुन तात्काळ  कामावरून काढून टाकलेल्या एका कर्मचाऱ्याने आपली निराशा व्यक्त केली आहे. त्याचं असं म्हणणं आहे की, “ज्या कामगारांनी इतके कठोर परिश्रम केले त्यांच्यासाठी असे निष्काळजी होणे योग्य नाही. एका आईने नुकतेच बाळ जन्माला घातले आहे तिच्याकडे आरोग्य विमा आहे की नाही हेही या कंपनीने विचारले नाही.

कंपनीविरुद्ध खटला दाखल

एका माजी कर्मचाऱ्यानेही कंपनीविरुद्ध खटला दाखल केला आहे. टोरिया नील असं त्याचं नाव आहे. तो मिसिसिपी येथील रहिवासी आहे. त्याने आठ वर्षांहून अधिक काळ या कंपनीसाठी काम केले. तक्रारीत आरोप केला आहे की, कंपनीने फेडरल वर्कर ऍडजस्टमेंट अँड रीट्रेनिंग नोटिफिकेशन (WARN)  कायद्याचे उल्लंघन केले आहे. किमान आणि किमान प्रदान ६० दिवसांत प्रलंबित बंदची लेखी सूचनाही दिली नाही.

हेही वाचा

Back to top button