Punishment : पाढा आला नाही म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याच्या हातावर चालवले 'ड्रिल'

पुढारी ऑनलाईन डेस्क : विद्यार्थ्याला पाढा वाचता येत नाही म्हणून एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्याला शिक्षा (Punishment) देण्यासाठी त्याच्या हातावर ड्रिल मशीन चालवले. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश राज्यातील कानपूरमध्ये घडली. विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, शिक्षण अधिकार्यांची याची गंभीर दखल घेतली आहे.
कानपूरमधील प्रेमनगर य़ेथील प्राथमिक शाळेत विबान पाचवीच्या वर्गात शिकतो. त्याला दोनचा पाढा अनुज नावाच्या शिक्षकांनी वाचायला सांगितलं. त्याला पाढा वाचता आला नाही. संतापलेल्या शिक्षकाने मुलाच्या हातावर ड्रिल (Drill) मशीन चालवून त्याला जखमी केले, असा आरोप विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी केला. ही घटना गुरुवारी (दि.२४ नोव्हेंबर) घडली. ही घटना विबानच्या घरी समजताच त्याच्या नातेवाईकांनी शाळेत गोंधळ घातला. प्रकरणाची माहिती बीएसएला (Basic Shiksha Adhikari (Education officer) मिळताच त्यांनी घटनास्थळी येवून प्रकरणाची चौकशी केली.
Punishment : ड्रिल मशिनने शिक्षा
विबानच्या हातावर शिक्षकाने ड्रिल मशीन चावले त्याच्या हातातून रक्त आल्यानंतर वर्गात एकच गोंधळ उडाला. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले. बेसिक एज्युकेशन कौन्सिल एम्प्लॉईज युनियनचे विभागीय अध्यक्ष परवेज आलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलासोबत झालेल्या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, गुरुवारी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष यादव रजेवर होते. सहायक शिक्षिकेच्या हातात चार्ज होता.
शाळेत बीएसए सुरजित कुमार यांच्या परवानगीने कौशल्य विकास योजनेंतर्गत मुलांना विविध प्रकारचे शिक्षण दिले जाते, त्याचसाठी ड्रिल मशीन ठेवण्यात आले होते. परवेज आलम यांचा शिक्षकांशी संवाद झाल्यानंतर त्यांना समजले की, मुलाला दोनचा पाढा ऐकवला जात होता, मात्र त्याचे लक्ष नव्हते. त्यामुळे त्याला घाबरवण्याच्या उद्देशाने मशीन सुरू करण्यात आल्याची शक्यता आहे, परंतु मशीनमुळे मुलगा जखमी झाला.
शिक्षक जबाबदार
परवेज आलम यांनी सांगितले की, हे अत्यंत धोकादायक आहे, अशा संस्थेने तात्काळ शाळेतून या शिक्षकाला काढून टाकावे. दुसरीकडे, अजून तरी नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नाही. शाळेत मुलांना योग्यरित्या शिकवले जात नसल्याचे मुलाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
Kanpur, UP | The incident happened in Prem Nagar, Kanpur. We have sought reports from concerned education officers in the area. Strict action is to be taken against those found guilty: Sujit Kumar Singh, Basic Education officer, Kanpur (26.11) pic.twitter.com/CAkxdwPP3w
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 27, 2022
Uttar Pradesh | A teacher at a school in Kanpur allegedly used a drill machine on a student’s hand after he couldn’t recite a mathematical table. The student sustained a minor injury & was given primary treatment. (26.11)
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 27, 2022
हेही वाचा
- रायगड : दारूमुक्तीसाठी आज खारघर शहर बंद
- NASA’s Orion SpaceCraft : ‘ओरियन’ने टिपली चंद्राच्या पृष्ठभागावरील विवरे