Bisleri Company Sell : ७००० कोटींची बिस्लेरी कंपनी न चालवण्याचा निर्णय घेणाऱ्या कोण आहेत जयंती चौहान ? जाणून घ्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक उद्योगपतींच्या घरच्या लोकांमध्ये संपत्तीचा वाद पहायला मिळत आहे. पण, आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीची ओळख करून देणार आहोत, ज्यांनी आपल्या वडिलांची ७००० कोटींची संपत्ती हाताळण्यास नकार दिला आहे. या मुलीने वडिलांच्या व्यवसायात कोणताही रस दाखवला नाही. त्यामुळे ३० वर्षे जुनी आणि लोकप्रिय बिसलेरी कंपनी विकण्याचा निर्णय घेण्यात आला. पॅकेज्ड वॉटर कंपनी बिस्लेरीचे मालक रमेश चौहान हे आपली कंपनी टाटाला विकणार आहेत. बिसलेरी विकण्याच्या निर्णयाबद्दल रमेश चौहान खूप भावूक आहेत. त्यांनी आजवर ज्या पद्धतीने ही कंपनी हाताळली आहे, त्याप्रमाणे त्यांना सांभाळणारे कोणीही नसल्याचे त्यांनी सांगितले. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी जयंती चौहान हिला या व्यवसायात फारसा रस नाही, त्यामुळे त्यांना आपला व्यवसाय विकावा लागत आहे. (Bisleri Company Sell)
बिस्लेरी हा भारतातील प्रसिद्ध पॅकेज्ड वॉटर बॉटलचा ब्रँड आहे. अनेक स्थानिक कंपन्या या पाणी बॉटल ब्रँडच्या नावाचे अनुकरण करुन मिळता जुळता शब्द वापरुन साधर्म्य असल्याचे दर्शवत असतात. रमेश चौहान हे या लोकप्रिय ब्रँडचे मुख्य संचालक आहेत. त्याचबरोबर त्यांचे थम्स अप, गोल्ड स्पॉट आणि लिम्का हे ब्रँड देखील त्यांचे होते पण त्यांनी थम्स अप आणि लिमका हा ब्रँड कोकाकोला या कंपनीला विकला. तर बिस्लेरी हा प्रसिद्ध ब्रँड सध्या Tata Consumer Products ने 7,000 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्याचे स्वारस्य दाखवले आहे.
2023 च्या आर्थिक वर्षात बिस्लेरीला 220 कोटी रुपयांचा नफा अपेक्षित आहे. कंपनीने 2021 मध्ये 95 कोटी रुपये आणि 2020 मध्ये 100 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांच्या मुलीला बिसलेरी व्यवसायात रस नाही. कंपनीचा व्यवसाय दुसऱ्याकडे सोपवण्यापूर्वी सध्याचे व्यवस्थापन दोन वर्षे चालू राहील. तसेच ते हा सर्व पैसा पाणी साठवण्याची प्रक्रिया, प्लॅस्टिक रिसायकलिंग आणि समाजसेवा यासाठी वापरणार आहेत.
जयंती चौहान यांच्याबाबत जाणून घ्या
जयंती चौहान या रमेश चौहान यांच्या कन्या आहेत. त्या सध्या ३७ वर्षांच्या आहेत. त्यांनी Production Development मध्ये पदवीचे शिक्षम पूर्ण केले आहे. त्यांनी लॉस एंजेलिसमधील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि मर्चेंडाइझिंगचे देखील शिक्षण पूर्ण केले आहे. कपड्यांच्या वेगवेळ्या स्टाईलचा म्हणजे फॅशन बाबत देखील त्यांनी अभ्यास केला आहे. त्याचबरोबर लंडनमधील फोटोग्राफी आणि फॅशन स्टाइलिंगचेही त्यांनी शिक्षण घेतले आहे. त्या सध्या बिस्लेरीच्या उपाध्यक्षा आहेत. 24 वर्षांच्या असताना त्यांनी कंपनीसाठी काम करायला सुरुवात केली. व्यवसायाच्या उभारणीसाठी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
जयंती यांचा बिस्लेरी कंपनी चालवण्यासाठी नकार
बिस्लेरी कंपनी विकल्याची बातमी येताच जयंती यांचे नाव चर्चेत आले. त्यानंतर लोकांना त्यांच्याबाबत माहिती घेण्याची उत्सुकता लागली आहे. त्यांनी कंपनीची जबाबदारी घेण्यास का नकार दिला याबद्दल स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही. मात्र फॅशनशी संबंधित व्यवसायावर जयंती लक्ष केंद्रित करतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. तसेच त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलवर त्यांनी एक पोस्ट केली आहे. यामध्ये लिहिले आहे की, प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. या पोस्टवरुन कंपनी विकण्यापाठीमागे काहीतरी महत्त्वाचे कारण असावे किंवा कोणतेतरी नवे नियोजन असावे अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यांच्या या पोस्टवर लोकांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘युवकांमधील फुटबॉल वर्ल्डकपची ‘क्रेझ’ इस्लामविरोधी’ https://t.co/6dh5myrcne #FIFAWorldCup #FIFAWorldCupQatar2022 #IndianFootball #Kerala
— Pudhari (@pudharionline) November 26, 2022
हेही वाचा
- Virat Kohlis instagram post : ”२३ ऑक्टोबर नेहमीच माझ्यासाठी विशेष…” विराट कोहलीची पोस्ट चर्चेत…
- Heart attack Symptoms : वेळीच धोका ओळखा : हृदयविकारापूर्वी पुरुषांना जाणवतात ‘ही’ लक्षणे…
- FIFA World Cup : अर्जेंटिनासाठी आजचा सामना ‘करो या मरो’