दिल्‍लीच्या चांदणी चौकात भीषण आग; १०० दुकाने जळून खाक, अग्‍निशमनच्या ४० गाड्या घटनास्थळी | पुढारी

दिल्‍लीच्या चांदणी चौकात भीषण आग; १०० दुकाने जळून खाक, अग्‍निशमनच्या ४० गाड्या घटनास्थळी

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन : दिल्‍लीच्या चांदणी चौकात भीषण आग लागली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाटीवाटीने दुकाने आहेत. त्‍यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. इथे दिल्‍लीतले सर्वात मोठे इलेक्‍टॉनिक मार्केट आहे. या ठिकाणी अग्‍निशमन दलाच्या ४० गाड्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. मार्केटमधील जवळपास १०० दुकाने या भीषण आगीत भस्‍मसात झाली असून, भगीरथ पॅलेस इमारतीचा काही भाग कोसळला आहे.

दरम्‍यान अजुनही काही दुकानांमधून धुराचे लोट बाहेर पडत आहेत. या मार्केटमध्ये अरूंद गल्‍ल्‍या असल्‍यामुळे अग्‍निशमन दलाच्या गाड्यांना आगीच्या ठिकाणी पोहोचताना अडचणी निर्माण होत आहेत. अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

उत्‍तर दिल्‍लीतल्‍या चांदणी चौकातील भगीरथ पॅलेसमध्ये इलेक्‍ट्रिकल आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे मोठे मार्केट आहे. काल (गुरूवार) रात्री या मार्केटमध्ये भीषण आग लागली. सुरूवातील अग्‍निशमनच्या १८ गाड्या घटनास्‍थळी पाठवण्यात आल्‍या. आगीची भीषणता वाढल्‍यावर पुन्हा २२ गाड्या घटनास्‍थळी दाखल झाल्‍या. पोलिस आणि अग्‍निशमनदलाच्या जवानांनी येथील लोकांना सुरक्षीत स्‍थळी हलवले. यानंतर हे मार्केट मोकळे करण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार रात्री ९ ते ९:३० वाजण्याच्या सुमारास आगीची माहिती मिळाली. यावेळी भगीरथ पॅलेस या दुकानाला आग लागली असून, जवळपासच्या इतर दुकानांनाही आगीने कवेत घेतल्‍याची माहिती मिळाली. यावेळी तात्‍काळ अग्‍निशमनला याची माहिती देण्यात आली. यावेळी अग्‍निशमनच्या जवळपास १८ गाड्या घटनास्‍थळी पाठवण्यात आल्‍या.

आग लागण्याच्या आधी मार्केट बंद झाले होते. दुकान मालक आणि कर्मचारीही दुकाने बंद करून घरी निघुन गेले होते. दुकानांच्या बाहेर झोपणाऱ्या कर्मचारी आणि मजुर हेच यावेळी मार्केटमध्ये होते. आग लागल्‍यावर हे कर्मचारी आणि मजूर सुरक्षीत ठिकाणी पळून गेले. या माकेट मध्ये दाटीवाटीने दुकाने असल्‍याने एका पाठोपाठ एक याप्रमाणे दुकानांना आगी लागण्यास सुरूवात झाली. यामुळे या परिसरात मोठा गलका सुरू झाला. दुकान मालकांनी घटनास्‍थळी धाव घेतली. यावेळी आगीचे प्रचंड लोट निघत होते. अजुनही काही दुकानांमधून धुराचे लोट बाहेर पडत आहेत.

 


हेही वाचा : 

Back to top button