‘आप’च्या आमदाराची कार्यकर्त्यांकडूनच धुलाई: भरसभेतून काढला पळ (पाहा व्हिडिओ)
पुढारी ऑनलाईन डेस्क : आम आदमी पक्षाचे मतियालाचे आमदार गुलाब सिंह यादव यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आमदार यादव स्वतःला वाचवण्यासाठी सभेच्या ठिकाणाहून पळत आहेत. तर काही लोक त्यांचा पाठलाग करत असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ शेअर करत भाजपने आम आदमी पार्टीवर तिकीट विकल्याचा आरोप केला आहे. या घटनेबाबत आम आदमी पक्षाकडून दुजोरा देण्यात आलेला नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आठच्या सुमारास आमदार यादव 'श्याम विहार' येथे आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत होते. यावेळी वाद झाला आणि कार्यकर्त्यांनी आमदाराला मारहाण करण्यास सुरुवात केली.
या घटनेवर भाजपच्या प्रवक्त्याने निशाणा साधत ट्विट केले आहे की, 'आप' चा भ्रष्टाचार एवढा वाढला आहे की, त्याचे सदस्यही आपल्या आमदारांना आता सोडत नाहीत. आगामी एमसीडी निवडणुकीतही अशाच निकालांची प्रतीक्षा आहे. 'आप'च्या आमदाराला मारहाण झाल्याचे ट्विट दिल्ली भाजपने केले आहे. तिकीट विकल्याच्या आरोपावरून आम आदमी पक्षाचे आमदार गुलाब सिंह यादव यांना आप कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यादव यांच्याप्रमाणे 'आप'च्या सर्व भ्रष्ट आमदारांचा नंबर येईल.
त्याचवेळी आमदार गुलाब यादव यांनी या संपूर्ण घटनेवर ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजप हतबल झाला आहे आणि तिकिटे विकल्याचा बिनबुडाचा आरोप करत आहे.
हेही वाचलंत का ?

