काँग्रेसचे माजी खासदार महाबल मिश्रा यांचा ‘आप’ मध्ये प्रवेश | पुढारी

काँग्रेसचे माजी खासदार महाबल मिश्रा यांचा 'आप' मध्ये प्रवेश

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली महापालिकेची निवडणूक तोंडावर असतानाच काँग्रेसचे माजी खासदार महाबल मिश्रा यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत मिश्रा यांनी रविवारी (दि.२०) ‘आप’ मध्ये प्रवेश केला.

आम आदमी पक्षाने कमी वेळेत लोकांच्या हितासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. या योजनांचा थेट लाभ नागरिकांना मिळत आहे. यामुळे प्रभावित होऊन आपण ‘आप’ मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे, असे मिश्रा यांनी सांगितले. वर्ष 2009 ते 2014 या कालावधीत मिश्रा यांनी पश्चिम दिल्ली लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे त्यांचे पुत्र विनय यांनी द्वारका विधानसभा मतदारसंघातून ‘आप’ तर्फे निवडणूक लढवीत विजय मिळवला होता.

हेही वाचलंत का ? 

Back to top button