MCD Elections : ‘एमसीडी’ निवडणुकीसाठी ‘आप’ची तिकीट विक्री : स्टिंग ऑपरेशनच्‍या आधारे भाजपचा आरोप | पुढारी

MCD Elections : 'एमसीडी' निवडणुकीसाठी 'आप'ची तिकीट विक्री : स्टिंग ऑपरेशनच्‍या आधारे भाजपचा आरोप

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली महापालिकेच्या (MCD Elections) निवडणुकीत तिकीट देण्याच्या मोबादल्यात आम आदमी पक्ष पैसे मागत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. एका स्टिंग ऑपरेशचा दाखला देत भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोमवारी  हे आरोप केले. आप नेते बिंदू श्रीराम यांनी हे स्टिंग ऑपरेशन केले असून, त्यांना रोहिणीच्या वार्ड क्रमांक ५४ मधून उमेदवारीच्या मोबदल्यात ८० लाखांची मागणी करण्यात आल्याचा दावा भाजपने केला आहे.

(MCD Elections) आप पक्ष भ्रष्टाचाराच्या चिखलाने माखला असल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी करीत दोषींना तत्काळ अटक करण्याची मागणी भाजपने केली आहे. या स्टिंग ऑपरेशन नंतर भाजप आमदार विजेंद्र गुप्ता यांनी देखील आपवर आरोप करीत ‘कट्टर प्रामाणिक’ असलेला पक्ष ‘कट्टर भ्रष्टाचारी’ असल्याचे जनतेला कळून आले असल्याचा दावा केला आहे.

याच स्टिंग ऑपरेशच्या आधारे दिल्ली विधानसभा निवडणुकीतदेखील आपने तिकिटांच्या मोबदल्यात पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्ली महानगर पालिकेसह विधानसभा निवडणुकीत पक्षाने तिकिटांची विक्री केल्याचा दावा भाजपने केला आहे. आपने तिकीट खरेदी करण्यासाठी दलालांना पाठवले आहे. दिल्लीकरांना लुटले जात आहे. पैसे देवू शकणाऱ्यांनाच तिकीट दिले जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button