Shraddha Murder Case: आफताबचे हिमाचल प्रदेशातील ड्रग्ज तस्करांशी संबंध

Shraddha Murder Case: आफताबचे हिमाचल प्रदेशातील ड्रग्ज तस्करांशी संबंध
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब पुनावला याच्या चौकशीतून नवनवीन बाबी समोर येऊ लागल्या आहेत. या प्रकरणी (Shraddha Murder Case) अनेक धागेदोरे दिल्ली पोलिसांना मिळू लागले आहेत. आता आफताबचे हिमाचल प्रदेशातील ड्रग्ज तस्करांशी संबंध आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी दिल्ली पोलिसांचे एक पथक हिमाचल प्रदेशातील कसौल सीमेवर असलेल्या तोष या गावी गेले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

याबाबत Shraddha Murder Case) दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, आफताबला गांजा आणि चरस घेण्याची सवय होती. त्याच्या मोबाईलमधून तोष गावातील काही ड्रग्ज तस्करांचे फोन नंबर आढळून आले आहेत. त्यानंतर तोष गावातील एका गेस्ट हाऊस मालकाची पोलिसांनी चौकशी केली आहे. आफताब तोष या गावी फिरण्यासाठी गेला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

श्रद्धा वालकरचा खून केल्याची कबुली दिल्यानंतर आफताब याला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. त्याने केलेले ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडियावरील चॅटमधील तपशील तसेच काही विसंगत असलेली माहिती याबाबत तपासणी करायची असल्याने आफताबची नार्को टेस्ट करू द्यावी, अशी विनंती पोलिसांनी साकेत कोर्टासमोर केली. न्यायालयाने त्याला मंजुरी दिली. त्याची आज (दि.२०) नार्को टेस्ट होणार होती. परंतु त्याआधी पॉलिग्राफ चाचणी करण्यात येणार आहे. परंतु त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे.

दरम्यान, या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाच्या मोबाईलबाबत आफताबने दिलेल्या विसंगत माहितीतून सार्‍या प्रकाराचा भंडाफोड झाला. १८ मे रोजी श्रद्धाचा खून झाल्यानंतर आणि एकेक करीत तिच्या शरीराचे ३५ तुकडे फेकून दिल्यानंतर आफताब निर्धास्त झाला. ऑक्टोबर महिन्यात तिच्या वडिलांनी पोलिसांना, आफताबची चौकशी केली तेव्हा त्याने २२ मे रोजी श्रद्धा भांडण झाल्यानंतर रागारागात घर सोडून गेली. जाताना तिने फक्त मोबाईल सोबत ठेवला, तिचे कपडे व इतर सामान घरीच आहे, असे सांगितले होते.

त्यानंतर पोलिसांनी श्रद्धाच्या मोबाईलचे ट्रॅकिंग सुरू केले. कॉल्सचा तपशील आणि लोकेशन्स तपासले. त्यात 22 आणि 26 मे रोजी श्रद्धाच्या खात्यातून 54 हजार रुपये आफताबच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे समोर आले. यावेळी बँकेच्या अ‍ॅपवर फोनचे नोंदले गेलेले लोकेशन मेहरोलीचेच होते. शिवाय, श्रद्धाच्या इन्स्टाग्रामवरील चॅटची झाडाझडती घेतली असता, त्यावेळीही लोकेशन मेहरोलीचेच होते. यामुळे संशय बळावल्यावर पोलिसांनी पुन्हा चौकशी केली. 18 मे रोजी श्रद्धा निघून गेल्यावर मेहरोलीतूनच तिने पैसे कसे खात्यात जमा केले, असे विचारताच आफताबला आपले भांडे फुटल्याचे समजले आणि तो रडू लागला. नंतर त्याने सगळा कबुलीजबाब दिला, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news