Isha Ambani
Isha Ambani

Isha Ambani : मुकेश अंबानींची मुलगी ईशाने दिला जुळ्या बाळांना जन्म

Published on

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी ( Isha Ambani ) हिने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. यामुळे मुकेश अंबानी पुन्हा एकदा आजोबा बनले आहेत. ईशाचे लग्न पिरामल ग्रुपच्या आनंद पिरामल याच्यासोबत झाले आहे. ईसाने जन्म दिलेल्या बाळांमध्‍ये एक मुलगा आणि एका मुलगी आहे. मुलीचे नाव आदिया (Aadiya) तर मुलाचे नाव कृष्णा (Krishna) असे ठेवण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,( Isha Ambani ) ईशाने शनिवार, १९ नोव्हेंबर रोजी जुळ्या बाळांना जन्म दिला. यामुळे संपूर्ण अंबानी आणि पिरामल कुटुंबीयामध्‍ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ईशा अंबानीने १२ डिसेंबर २०१८ रोजी पिरामल ग्रुपच्या आनंद पिरामलसोबत विवाह बंधनात अडकली. ईशा आणि आनंद यांच्या लग्नाचा देशातील सर्वात महागड्या विवाहांच्या यादीत समावेश आहे. या विवाहाला बॉलिवूड आणि जगभरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.

आनंद पिरामल याचे कुटूंब हे मुळचे राजस्थानचे आहेत. मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी हिला नुकतीच रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची संचालक बनविण्यात आले आहे. मुकेश अंबानींच्या तीन मुलांपैकी ईशा अंबानी सर्वात मोठी आहे. ईशाने अमेरिकेच्या येल विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी  तर  स्टॅनफोर्ड, कॅलिफोर्निया येथून एमबीएचे शिक्षण घेतले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news