Ajit Pawar: ‘आता गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आली’… विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सूचक ट्विट | पुढारी

Ajit Pawar: 'आता गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आली'... विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सूचक ट्विट

पुढारी ऑनलाईन: महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहून जर माननिय राज्यपालांना महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील. महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या जनतेची लोकभावना कळत नसेल, तर भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल पदावर राहण्याबाबत गांभीर्याने दखल घेत, पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. असे मत व्यक्त करत राष्ट्रवादी कॉग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच इशारा दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत. त्यांच्या या व्यक्तव्याने राज्यभरात तीव्र पडसात उमटले आहेत.

पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करत, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधानांनी गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या घटनेवर तातडीने निर्णय घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच माननीय राज्यपाल महोदयांना सद्‌बुद्धी लाभो, ही प्रार्थना! असे खोचक वक्तव्य देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केले आहे.

छत्रपतींनाच आदर्श मानून महाराष्ट्र घडला अन् पुढेही घडत राहील

अजित पवार यांनी म्‍हटलं आहे की,.  शिवाजी महाराज हे जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ असे आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी जगापुढे निर्माण केला आहे. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनाच आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला आहे आणि यापुढेही घडत राहील, असे शिवाजी महाराजांविषयी गौरोद्गारही त्यांनी काढले आहेत.

 

Back to top button