गुजरात विधानसभा निवडणूक : पीएम मोदी, राहुल गांधी, केजरीवाल यांची सोमवारी रॅली | पुढारी

गुजरात विधानसभा निवडणूक : पीएम मोदी, राहुल गांधी, केजरीवाल यांची सोमवारी रॅली

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात विधानसभेच्या प्रचारसाठी सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल सोमवारी (दि. २१) निवडणूक रॅलीला संबोधित करणार आहेत. पी.एम. नरेंद्र मोदी १९ ते २१ नोव्हेंबर पर्यंत गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी २१ नोव्हेंबरला गुजरातमध्ये दाखल होणार आहेत. तर अरविंद केजरीवाल रविवारी (दि.२०) गुजरातमध्ये दाखल होतील. केजरीवाल २२ नोव्हेंबरपर्यंत प्रचार करणार आहेत.

सोमवारी (दि.२१) निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या तीन प्रमुख पक्षांचे नेते गुजरातमध्ये आपल्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पासून गुजरातच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते गुजरातमध्ये ८ सभांना संबोधित करणार आहेत. मोदी २३ आणि २४ नोव्हेंबरला पुन्हा एकदा गुजरात दौरा करणार आहेत. पीएम मोदी रविवारी सकाळी सोमनाथ मंदिराचे दर्शन घेऊन पूजा करतील. यानंतर ते वरावल, धौराजी, अमरेली आणि बोटाडमध्ये प्रचार सभेला संबोधित करणार आहेत. वराहलमध्ये ११ वा, धौराजीमध्ये १२.४५ वा. तर अमरेलीमध्ये दुपारी २.३० वा ते जनतेशी संवाद साधतील.

राहुल गांधी २१ नोव्हेंबरला गुजरातमध्ये ..

काँग्रेस नेते राहुल गांधी २१ नोव्हेंबरला राजकोट आणि सुरतमध्ये सभेला संबोधित करतील. राहुल गांधी सध्या ‘भारत जोडो यात्रे’चे नेतृत्व करत आहेत. भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. ती २० नोव्हेंबरला मध्येप्रदेशमध्ये प्रवेश करणार आहे. राजस्थानमधील काँग्रेस नेते रघू शर्मा यांच्या मतानुसार, राहुल गांधी २१ नोव्हेंबरला विराट सभेला संबोधित करण्यासाठी दक्षिण गुजरातमधील राजकोट आणि महुआमध्ये पोहचतील.

राहुल गांधी अडीच महिन्यानंतर गुजरात दौऱ्यावर येणार आहेत. त्यांनी ७ डिसेंबरला कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रा’ सुरू केली होती. तत्पूर्वी त्यांनी अहमदाबादमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. गुजरातमध्ये दोन टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकीसाठी १ आणि ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर मतमोजणी ८ डिसेंबरला होईल.

हेही वाचलंत का?

Back to top button