Cow Reached ICU Ward : विना अडथळा गाय पोहचली थेट रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात; व्हिडिओ व्हायरल | पुढारी

Cow Reached ICU Ward : विना अडथळा गाय पोहचली थेट रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात; व्हिडिओ व्हायरल

भोपाळ; पुढारी ऑनलाईन : सध्या मध्य प्रदेशातील एका रुग्णालयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. खरं तर, या व्हिडिओमध्ये एक गाय रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये थेट न अडवता पोहचली आहे. तेथे ती एका कचऱ्याच्या बॅगमधून काहीतरी खाताना दिसत आहे. ही घटना मध्यप्रदेशमधील राजगढ जिल्ह्यातील रुग्णालयातील आहे. रुग्णालयामध्ये दिवसभर सुरक्षा रक्षक तैनात असतात, परंतु ज्यावेळी ही गाय आयसीयू वॉर्डमध्ये पोहोचली त्यावेळी तेथे सुरक्षा रक्षक दिसत नव्हता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरक्षा रक्षकासह तिघांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. (Cow Reached ICU Ward)

एएनआयशी बोलताना हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन राजेंद्र कटारिया म्हणाले की, मी संपूर्ण घटनेची दखल घेतली आहे आणि वॉर्ड बॉय आणि सुरक्षा रक्षकाला तात्काळ कामावरून काढून टाकले आहे. (Cow Reached ICU Ward)

याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री प्रभुराम चौधरी यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, आपल्याला या घटनेची माहिती नव्हती, मात्र नंतर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई करताना तिघांना नोकरीवरुन काढण्यात आल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले.

संबंधित बातम्या


अधिक वाचा :

 

Back to top button