Delhi MCD Election : एमसीडी निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपची जोरदार तयारी | पुढारी

Delhi MCD Election : एमसीडी निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपची जोरदार तयारी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. रविवारपासून (दि. २०) भाजप एमसीडी निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा करणार आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा हे या प्रचार अभियानाचा शुभारंभ करतील. राज्यातील १४ ठिकाणी पक्षाकडून ‘रोड शो’ करीत शक्तीप्रदर्शन केले जाईल. राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वात या ‘विजय संकल्प’ रोड शो चे आयोजन करण्यात आले आहे. (Delhi MCD Election)

या प्रचार अभियानात केंद्रीय संरक्षण मंत्र्यांसह हरदीप पुरी, गजेंद्र शेखावत तसेच मीनाक्षी लेखी सहभागी होतील. यासोबतच भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा (आसाम), मनोहरलाल खट्टर (हरियाणा), पुष्कर सिंह धामी (उत्तराखंड) तसेच जयराम ठाकूर (हिमाचल) देखील रोड शो करतील. (Delhi MCD Election)

यंदा एमसीडी निवडणुकीत भाजप विरुद्ध आप अशी थेट लढत होणार आहे. आपने यंदा पालिका निवडणुकीत विजयाचा निर्धार केला आहे. पक्षाने अगोदर पासूनच प्रचार सुरु केला आहे. भाजप एमसीडी गमावणार असा दावा आप नेत्यांकडून केला जात आहे. अशात भाजपच्या प्रचार अभियानामुळे निवडणुकीत आणखी रंगत चढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Back to top button