बेळगाव : ‘जिल्हा प्रशासन निघाले खेड्याकडे’ या मोहिमेअंतर्गत गावात बार बंदची कारवाई | पुढारी

बेळगाव : 'जिल्हा प्रशासन निघाले खेड्याकडे' या मोहिमेअंतर्गत गावात बार बंदची कारवाई

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा प्रशासन निघाले खेड्याकडे  मोहिम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा सौंदती तालुक्यातील उगारगोळा गावात पाहणी केली. गावात आज सकाळी त्यांचे स्वागत केल्यानंतर ते थेट बसवेश्वर सर्कलमध्ये असलेल्या लक्ष्मी बार मध्ये जाऊन तेथील दुकानाची तपासणी केली. काही दारूच्या बाटल्या तपासणीसाठी अहवालानंतर बार बंद करण्यात आला.

गावातील बसवेश्वर सर्कल येथील जिल्हाधिकारी आनंदा ब्रँडीच्या दुकानात जाऊन परवाना, साठा व उपलब्धतेचा दर्जाची पाहणी केली. यानंतर गुणवत्ता तपासण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तपारणीसाठी पाठवले. दरम्‍यान, महिला व ग्रामस्थांनी गावातील दारूची दुकाने बंद करावीत, अशी मागणी केली. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर सध्या दारुची दुकाने बंद करण्यात आली आहेत.

हेही वाचा 

Back to top button