Donald trump पुन्‍हा लढविणार अमेरिका राष्‍ट्राध्‍यक्षपदाची निवडणूक | पुढारी

Donald trump पुन्‍हा लढविणार अमेरिका राष्‍ट्राध्‍यक्षपदाची निवडणूक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प ( Donald trump )  हे २०२४ मध्‍ये होणार्‍या राष्‍ट्राध्‍यक्षपदाच्‍या निवडणूक रिंगणात उतरणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍यांनी उमेदवारी दाखल करण्‍यासंदर्भातील सर्व कागदपत्र दाखल केली आहेत.

कागदपत्र दाखल केल्‍यानंतर ट्रम्‍प म्‍हणाले की, अमेरिकोला पुन्‍हा एकदा महान आणि गौरवशाली बनविण्‍यासाठॅ मी राष्‍ट्राध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीत उमेदवारीची घोषणा करत आहे. तर यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडेन यांनी म्‍हटलं आहे की, ट्रम्‍प यांनी पुन्‍हा एकदा अमेरिकेला निराश केले आहे.

Donald trump यांनी दिले होते निवडणूक लढविण्‍याचे संकेत

डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनी ८ नोव्‍हेंबर रोजी एक ट्वीट केले होते. यामध्‍ये म्‍हटलं होती मी १५ नोव्‍हेंबर रोजी मोठी घोषणा करणार आहे. याचवेळी ते २०२४च्‍या राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणुकीत उतरतील, असे संकेत मिळाले होते. माझ्‍या कारकीर्दीत अमेरिका हा एक महान देश होता. मात्र आता आमच्‍या देशाचा र्‍हास सुरु आहे. एक देश म्‍हणून आम्‍ही अशयस्‍वी ठरलो आहोत.

आमची सत्ता असती तर युक्रेन युद्ध झालेच नसते : ट्रम्‍प

आमचा रिपब्‍लिकन पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. तसेच अमेरिकेतील एक सक्षम आणि शक्‍तीशाली पक्ष आहे. आगामी निवडणुकीत आमचा पक्ष सर्वोच्‍च प्रदर्शन करेल. मी राष्‍ट्राध्‍यक्ष असतो तर रशिया-युक्रेन युद्ध झालेच नसते, असा दावाही यावेळी ट्रम्‍प यांनी केला.

ट्रम्‍प तिसर्‍यांदा निवडणूक रिंगणात उतरणार

डोनाल्‍ड ट्रम्‍प हे तिसर्‍यांदा अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. २०१६ मध्‍ये त्‍यांनी राष्‍ट्राध्‍यक्षपदाची निवडणूक जिंकली होती. यानंतर त्‍यांनी २०२० मध्‍ये निवडणूक लढवली मात्र त्‍यांचा पराभव झाला. या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे ज्‍यो बायडेन यांनी बाजी मारली होती. आता तिस्‍रांयादा ट्रम्‍प निवडणूक रिंगणात उतणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

 

 

 

Back to top button